Nashik politics : भाजप श्रेष्ठींच्या निर्णयाने संभ्रम; सानप-आहेर लॉजिक ने कार्यकर्त्यांना पडला प्रश्न

BJP News : भाजपने केली लोकसभा निवडणुकीची तयारी
Balasaheb Sanap, Keda Aher News
Balasaheb Sanap, Keda Aher NewsSarkarnama
Published on
Updated on

BJP Nashik Loksabha News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दिंडोरी मतदारसंघासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख केदा आहेर यांची नियुक्ती केली आहे. सानप व आहेर या लॉजिकमुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत.

आहेरांचा नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघाशी तर सानपांचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाशी काडीमात्र संबंध नसताना, दोघांच्या नियुक्तीने पक्षाच्या श्रेष्ठींना नेमके काय सिद्ध करायचे, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. भाजपची (BJP) महाराष्ट्रात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासोबत युती असली तरी भाजपच्या वतीने मागील आठवड्यात दोन महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या दोन्ही घोषणा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Balasaheb Sanap, Keda Aher News
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या नवनियुक्त कार्यकारी अध्यक्षा सुळे कुणाला रिपोर्टिंग करणार ? ; सुळे म्हणाल्या..

लोकसभेच्या ४५ तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा निवडून येण्याचे उद्दिष्ट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. भाजपने ४५ लोकसभा मतदारसंघासाठी जबाबदारी निश्चित केली आहे. या जबाबदारी निश्चितीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्याकडे दिली. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे दिली आहे.

मात्र, या दोघांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. कारण मूळचे देवळा येथील केदा आहेर यांचा लोकसभा मतदारसंघ दिंडोरी आहे. असे असताना त्यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात आली. बाळासाहेब सानप यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द नाशिक महानगरपालिकेपूर्ती मर्यादित राहिली आहे. त्यातही पंचवटी हेच त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे.

Balasaheb Sanap, Keda Aher News
BJP News : 'मुख्यमंत्री संमेलना'नंतर भाजपच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल? ; महाराष्ट्राचं कुठं अडलं?

असे असतानाही सापन यांच्याकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. सानप व आहेर या दोघांचाही त्यांना जबाबदारी दिलेल्या मतदार संघाशी संबंध नाही, त्यामुळे ते कितपत मतदारसंघापर्यंत पोहोचतील व दोन्ही मतदारसंघांमधील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदार त्यांना स्वीकारतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com