Sinnar APMC News: महाविकास आघाडीपुढे भाजपची अस्तित्वासाठी धडपड!

Sinnar Bazar Samiti: सिन्नर बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे गटाचे प्रबळ आव्हान.
Rajabhau Waje & Manikrao Kokate
Rajabhau Waje & Manikrao KokateSarkarnama

Fight in NCP & Shivsena Thackeray : सिन्नर तालुक्याच्या परंपरेप्रमाणे बाजार समितीच्या यंदाच्या निवडणुकीतही पक्ष बाजुला सारत व्यक्तीकेंद्रीत निवडणूक होत आहे. सत्ताधारी आमदार माणिकराव कोकाटे गटाला शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे गटाने प्रबळ आव्हान दिले आहे. महाविकास आघाडीतील घटकांतील या लढाईत भाजप मात्र अस्तित्वासाठी झगडताना दिसतो आहे. (BJP is fighting for there own existence)

सिन्नर (Sinnar) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC election) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) एकोपा, समन्वय दूर नेते एकमेकांची तोंडही पहात नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यापुढे शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे आव्हान आहे. त्यात भाजप (BJP) दोन्ही पॅनेलच्या नाराज उमेदवारांकडे डोळे लाऊन बसले आहे.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Devidas Pingle News : शेवटच्या टप्प्यातही पिंगळे विरोधकांना धक्का!

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या गटात मुख्य लढत होणार असली. तर भाजपकडून देखील यंदाच्या निवडणुकीत सक्षम पॅनल देण्याची घोषणा करण्यात आल्याने ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

वाजे-सांगळे गटाकडून प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र असून कोकाटे गटात मात्र उमेदवार निश्चितीची खलबते सुरू असल्याने माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळा, दुसऱ्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा, या दोन्ही कार्यक्रमांचे आयोजक भिन्न असले तरी तालुक्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याची संधी या निमित्ताने दोन्ही गटांकडून साधण्यात आली.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Jalgaon APMC Election News : महाविकास आघाडीची प्रचाराची गाडी सुसाट

खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत एका मताने का होईना आमदार कोकाटे गटाने सत्ता हस्तगत केल्यानंतर आता बाजार समितीच्या माध्यमातून ताकद दाखवण्याची संधी दोन्ही गटांना आहे. या निवडणुकीच्या यश अपयशावरच पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांची रणनीती असणार आहे.

बाजार समितीत असणारी सत्ता कायम राखण्यासाठी कोकाटे गटाकडून कोणती व्यूहरचना आखली जाईल हे अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होईल. वाजे-सांगळे गटाकडून मात्र त्याबाबत आघाडी घेतली गेली आहे. आमदार कोकाटे गटाच्या विरोधात भक्कम पॅनल निर्मिती करण्याची तयारी वाजे गटाकडून पूर्ण झाली असून पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी देखील घेतल्या जात आहेत. विभागस्तरावर मेळावे देखील वाजे गटाकडून घेतले जात आहेत. त्या उलट आमदार कोकाटे गटात माघारीपर्यंत कमालीची शांतता दिसून येत आहे.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Shinde Fadnavis Government : शिंदे फडणवीस सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण, खारघरच्या दुर्घटनेनंतर घेतला 'हा' मोठा निर्णय

भाजपची भूमिका काय?

भाजपकडून उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली खरी, मात्र इच्छुकांची गर्दी वाजे-कोकाटे गटातच दिसली. अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये या दोन्ही गटातील इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे भाजपकडून बाजार समितीच्या निवडणुकीत कोणता डाव टाकला जाईल त्यावरच त्यांनी केलेल्या घोषणेला महत्त्व येईल. वाजे-सांगळे गटाकडून प्रचारात घेतली गेलेली आघाडी त्यांच्या गटातील समर्थकांचे मनोबल वाढवणारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com