Shrirampur News : नगरमधील भाजप नेत्याला न्यायालयाचा दणका; महिला नेत्याबद्दल अपशब्द वापरल्याने 1 कोटींचा दंड

Ahmednagar : 2021 साली केलेलं वक्तव्य चांगलेच महागात पडले
BJP News
BJP News Sarkarnama

Ahmednagar News : महिला नेत्याबद्दल अपशब्द वापरणं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या एका भाजपच्या नेत्याला चांगलच महागात पडलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने भाजप नेत्याला तब्बल 1 कोटींचा दंड ठोठावला आहे.

श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याबाबत भाजपचे प्रकाश चित्ते यांनी अपशब्द वापरले होते. या प्रकरणी श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने प्रकाश चित्ते यांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

BJP News
Amalner Bazar Samiti Result : भाजपच्या तीन माजी आमदारांना धक्का देत राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची आघाडी

अनुराधा आदिक यांच्याबद्दल 2021 साली केलेले वक्तव्य प्रकाश चित्ते यांच्या चांगलच अंगलट आले आहे. अनुराधा आदिक यांनी दाखल केलेल्या मानहाणीच्या खटल्यात श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने प्रकाश चित्तेंना 1 कोटींचा दंड ठोठावला आहे.

BJP News
Ambad APMC Election : आमदार कुचे समर्थक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची..

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून प्रकाश चित्ते यांनी अनुराधा आदिक यांच्यावर आरोप करत त्यांच्याविषयी अपशब्द वापरले होते.

त्यानंतर याविरोधात अनुराधा आदिक यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणी अनुराधा आदिक यांनी 2021 मध्ये प्रकाश चित्ते यांच्याविरोधात श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयामध्ये पाच कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला होता.

BJP News
Nanded APMC Result News : अशोक चव्हाणांनी नांदेड बाजार समितीही राखली, भाजप-युतीला भोपळा..

दरम्यान, या प्रकरणामध्ये न्यायालयाने आता प्रकाश चित्ते यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकाश चित्ते यांनी केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com