Nashik BJP leader Threat : एवढ्या धडक कारवाईत कुणाची हिंमत? नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला गोळ्या घालण्याची धमकी

Nashik BJP leader death threat : नाशिकमध्ये गुन्हेगारांविरोधात पोलिसांकडून धडाकेबाज कारवाई सुरु असून धरपकड सुरु आहे. असे असताना भाजप पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Nashik Police Commissioner Sandeep KarnikSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार केला असून शहरात धडक कारवाई सुरु आहे. गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही अटक करुन पोलिसी खाक्या दाखवण्यात आला आहे. 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असे वाक्य गुन्हेगारांच्या तोंडून वदवून घेण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांची कारवाई राज्यभरात चर्चेचा विषय आहे.

स्वत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप करत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना पूर्णपणे फ्री हॅण्ड दिले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांची धरपकड सुरु आहे. नाशिक पोलिसांची कारवाई पाहाता भल्या भल्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. असे असताना आता नाशिक पोलिसांनाच आव्हान देण्याचा प्रयत्न कुणीतरी केला आहे.

एका व्यक्तीकडून भाजप पदाधिकाऱ्याला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकमधील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी शरद फडोळ यांना गुरुवारी (ता. ९) रात्री उशिरा फोनवरून ठार करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
Nashik Police : फडणवीसांनी फ्री हॅण्ड दिले, आता पोलिस आयुक्त म्हणतात गुन्हेगार छोटा असो की मोठा कुणालाही सोडणार नाही..

यासंदर्भात शरद फडोळ यांनी स्वत:माध्यमांना माहिती दिली. त्यानुसार, फडोळ हे गुरुवारी (दि. ९) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. समोरच्या व्यक्तीने अर्वाच्य भाषेत त्यांना शिवीगाळ केली. तसेच गोळ्या घालून ठार करण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर फडोळ यांनी तत्काळ अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची भेट घेत त्यांना सर्व काही सांगितले व तक्रार दिली. हवालदार सोमनाथ गुंड यांच्याकडे तपास असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा फोन कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला याचा तपास केला जात आहे.

Nashik Police Commissioner Sandeep Karnik
BJP Politics: धक्कादायक; भाजपचा स्वतःच्याच पदाधिकाऱ्यांवर भरोसा नाय काय?... शहराध्यक्ष सुनील केदार म्हणतात, ती नावे कळवा!

शहरात पोलिसांकडून गुन्हेगारांचा थरकाप उडेल अशा धडाकेबाज कारवाया केल्या जात आहेत. नाशिककरांनी देखील पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. असे असताना अशा प्रकारची धमकी आली असल्याने पोलिसांनाच एकप्रकारे आव्हान दिल्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या घटनेचा संबंध कोणत्या राजकीय अथवा गुन्हेगारी गटाशी आहे का? याचा तपास पोलिसांना करावा लागणार असून त्याकडे पोलिसांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com