Ajit Pawar Politics : कोकाटेंची उचलबांगडी, अजित पवारांनी मारले एका दगडात दोन पक्षी

Ajit Pawar removes Manikrao Kokate from Agriculture Ministry : माणिकराव कोकाटे यांची कृषीखात्यावरुन उचलबांगडी करुन अजित पवारांनी डबल गेम खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao Kokate
Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics : विधान भवनातील रम्मीचा डाव अखेर माणिकराव कोकाटे यांना भोवला आहे. माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरुन अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या थेट राजीनाम्याची मागणी होत असताना अजित पवार यांनी मात्र कोकाटे यांचे फक्त खाते बदलले आहे.

कोकाटे यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषीमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर कोकाटे यांच्याकडे भरणे यांचे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून खात्यांमधील हा बदल करण्याची विनंती केली. त्यानंतर फडणवीसांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना कळवत हा बदल केला. त्यामुळे अजित पवारांनी कोकाटे यांची खूर्ची वाचवली असली तरी खातेबदल करुन कोकाटेंना मोठा इशारा देखील दिला आहे.

दरम्यान कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत असताना केवळ खाते बदल केल्याने विरोधकांकडून अजित पवारांवर टीका होत आहे. परंतु कोकाटे यांची कृषीखात्यावरुन उचलबांगडी करुन अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. क्रीडा आणि युवक कल्याण खाते मिळाल्याने अजित दादांचे विश्वासू असलेले दत्तात्रय भरणे हे नाराज असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात खाते वाटप झाल्यानंतर भरणे यांनी नाराजी उघडही केली होती.

Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao Kokate
Mahayuti Politics : कोकाटेंना दणका बसताच शिंदेंचा मंत्री अलर्ट; योगेश कदमांकडून 'सावली बार'बाबत मोठा निर्णय!

मात्र आता विश्वासू दत्तामामा भरणेंना अजित पवारांनी कृषी खात्या सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी दिली आहे. एकीकडे नाराज भरणे यांना कृषीखाते देत त्यांची नाराजी अजित पवारांनी दूर केली. तर दुसरीकडे कोकाटे यांचे खाते बदलून अजित पवारांनी कारवाई केल्याचं दाखवलंय. तसेच कोकाटे यांचा थेट राजीनामा न घेता केवळ खाते बदल करुन कोकाटेंना मंत्रिमंडळात कायम ठेवल्याने अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा रंगली आहे.

Ajit Pawar, Dattatray Bharane, Manikrao Kokate
Suhas Kande : आमदार कांदेंचा गट देणार भाजपला 'जोर का' झटका, मनमाड बाजार समितीत राजकारण तापलं..

त्यामुळे नव्याने झालेल्या या खातेबदलानुसार आता राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे हे कारभार पाहतील तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी असेल. त्यामुळे आता कृषी खात्यासारंख संवेदनशील खातं दत्तात्रय भरणे कशाप्रकारे सांभाळतात हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com