Nashik Politics News : सानप यांचे एका दगडात दोन पक्षी! भाजप काय करणार?

Godavari River Puja Aarti Controversy Bjp Leader Balasaheb Sanap Entry : नाशिकमध्ये भाजप नेत्याने पक्षालाच दिले आव्हान?
Balasaheb Sanap
Balasaheb SanapSarkarnama
Published on
Updated on

Nashik Bjp Politics News :

गोदाआरतीसाठी गठीत करण्यात आलेल्या रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघातील वाद अद्याप मिटलेला नाही. या वादात आता BJP चे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी उडी घेतली आहे. ग्रामसभेचे आयोजन करण्यासह पुरोहित संघाला हक्क मिळवून देण्याची घोषणाही सानप यांनी केली. यानिमित्ताने साईड ट्रॅक असलेले सानप पुन्हा चर्चेत आले. पक्षाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. मात्र, अन्याय होत असल्यास न्याय मिळवून देण्याचे काम करावेच लागेल, असा दावा करीत सानप यांनी मतदारसंघात काम सुरू केल्याचे संकेतच दिले आहेत.

Balasaheb Sanap
Maharashtra Politics : 'अजित पवारांनी 'त्या' विधानांचे स्मरण करावे', गजानन शेलारांनी केले टार्गेट

परंपरेनुसार अनेक वर्षांपासून गोदाआरती पार पडते. मात्र, गोदाआरतीला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपने घेतला. यासाठी जिल्हाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली 22 सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली. या समितीत पुरोहित संघाच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले. मात्र, ही संख्या कमी असून परंपरेनुसार आमचा आरतीचा अधिकार कायम ठेवावा, अशी मागणी पुरोहित संघाकडून करण्यात येते आहे. पुरोहित संघ आणि नाशिकमधील आखाडे प्रमुखांची बैठकही पार पडली. पण अद्याप पुरोहित संघाच्या मागणीवर निर्णय झालेला नाही.

त्यातच पुरोहित संघाने यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांची मदत घेतली. आरती व पुजापाठ शेकडो वर्षांपासून सुरू आहे. ही कामे पुरोहित संघामार्फतच होतात. यात दुमत नाही. एक प्रकारे हा पुरोहितांवर अन्याय असून याबाबत ग्रामसभा घेण्याची तयारी सानप यांनी दर्शवत एक प्रकारे पक्षालाच आव्हान दिले. मात्र, मी अन्यायाविरोधात उभा आहे. त्यात पक्षाचा संबंध नाही. विकासकामे झालीच पाहिजेत. मला रामतीर्थ गोदावरी सेवा समितीत जाण्याची इच्छा नाही. शेकडो वर्षांपासून येथे काम करणाऱ्या पुरोहितावर अन्याय होऊ नये, अशी आपली भूमिका असल्याचे सानप यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील पाच कुंभमेळ्यांचा मी साक्षीदार आहे. नगरसेवक, उपमहापौर, महापौर पुढे आमदार म्हणून काम करताना या बाबी हातळल्या आहेत. याचा अनुभव असल्यानेच मी पुरोहित संघासोबत असल्याचे सानप म्हणाले. सानप अगदी सुरूवातीच्या काळापासून भाजपसोबत राहिले. मात्र, तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन आणि बाळासाहेब सानप यांच्यात दुही निर्माण झाली. त्यातच पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने सानप यांची दावेदारी डावलून राहुल ढिकले यांना पुढे केले. यामुळे सानप यांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. पण या तिकीटावर त्यांना विजय संपादन करता आला नाही. काहीच दिवसात त्यांनी पुन्हा भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला.

मूळ घरी परतल्यानंतर सानप अज्ञातवासातच आहे. पक्षाकडून एकप्रकारे त्यांना साईड ट्रॅक केल्याचे चित्र आहे. तुर्तास आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब सानप यांचे गोदाआरतीच्या निमित्ताने होणारे पुनरागमन लाभदायी ठरणार काय? याकडे सर्वांचे लक्ष आहे. गोदाआरतीचा वाद सुरू असलेला पंचवटी परिसर पूर्व विधानसभा मतदारसंघात येतो. येथे भाजपचे आमदार राहुल ढिकले हे प्रतिनिधित्व करतात.

edited by sachin fulpagare

Balasaheb Sanap
Maratha Reservation : उपोषणाआधी जरांगेंचा भुजबळांच्या बालेकिल्यात फेरफटका; मुख्यमंत्री नाशिकमध्येच

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com