Nashik Political News : अजित पवार यांनी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवार यांनी शिंदेंना स्वतंत्र पक्ष काढण्याचा सल्लादेखील आपल्या जाहीर भाषणातून दिला होता.
राष्ट्रवादीतील संघर्षावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर अजित पवार यांचे हेच भाषण सोशल मीडियावर चर्चेत आले. याच भाषणाचा संदर्भ देत 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे गजानन शेलार यांनी अजित पवार यांना टार्गेट केले. (Maharashtra Political News)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील बंडखोरीनंतर केलेल्या विधानांचे स्मरण करावे म्हणजे आपण कोण आहोत? याचा उलगडा त्यांना होईल. एका मिंध्याने बाप चोरला, दुसऱ्याने काकांचा पक्ष चोरला.
हे लोक जनतेला काय उत्तर देतील?, असा जोरदार हल्ला शेलार यांनी केला. 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाच्या शहर कार्यालयात झाली. त्यावेळी शेलार यानी मार्गदर्शन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कार्यकर्त्यांनी 'आमचा पक्ष, शरद पवार' अशा घोषणा देत शरद पवार यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. शेलार म्हणाले, निवडणूक आयोगाकडून असा निर्णय घेतला जाईल याची आम्हाला अपेक्षा होती. केंद्र शासनाने भारतीय जनता पक्षाच्या हितासाठी सर्व केंद्रीय संस्थांना आपले बटीक केले आहे. फक्त सत्तेसाठी ते लोक तपास यंत्रणांना शरण जात स्वपक्षाशी गद्दारी करीत आहेत, असा हल्ला शेलार यांनी केला.
हे लोक जनतेला काय उत्तर देतील?. त्यांनी कार्यकर्ते व जनतेला गृहीत धरू नये, त्यांना चोख उत्तर देण्याची व्यवस्था निष्ठावंत कार्यकर्ते करतील, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. या वेळी गोकुळ पिंगळे, सुरेश दलोड, मुन्नाभाई अन्सारी, अनिता दामले, राजेंद्र पवार, सागर बेदरकर, भावेश राऊत, प्रवीण नागरे, संजय गालफाडे, विजय मटाले, संतोष जगताप, समाधान कोठुळे, विजय जगताप, डॉ. युवराज कोठुळे, अशोक पाळदे, संजय गाडेकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.