BJP Prasad Lad News: फडणवीसांच्या लाडक्या लाड यांनी गृहखात्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडलं!

BJP leader Prasad lad questioned on police role in loudspeaker on mosque-भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणतात, मशीदीवरचे भोंगे अजुन का बंद होत नाहीत?
Prasad Lad & Devendra Fadanvis
Prasad Lad & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Prasad Lad news : सर्वोच्च न्यायालयाने मशीदींवरचे भोंगे अवैध ठरवले, तरीही ते काढले का जात नाहीत?. याबाबत महासंचालकांच्या स्तरावर निर्णय झालाय, मात्र पोलीस ठाण्यांना सूचना पोहोचलेल्या नाहीत. आता आम्ही पुन्हा हनुमान चालीसा पठण आणि राम आरती करावी का?. (Prasad lad criticized police on Mosque`s loudspeaker & love Jihad)

नियम २६० अन्वये मांडलेल्या सरकारी (BJP) प्रस्तावावर सत्ताधाऱ्यांनी चर्चा केली. त्यात आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी थेट पोलीसांनाच (Police) आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

Prasad Lad & Devendra Fadanvis
Nilesh Rane on Vaibhav Naik : निलेश राणे आणि वैभव नाईकांत श्रेयवाद

या विषयावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न पाहता ते सत्तेत आहेत की, अद्यापही विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत, असा प्रश्न पडावा अशी स्थिती होती. गृहखात्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहतात. त्यांचे लाडके प्रसाद लाड यांनी चर्चेत भाग घेतला. ते म्हणाले, लव्ह जिहादच्या माध्यमातून काही तरी विपरीत घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते.

ते पुढे म्हणाले, राहूरी येथे लव्ह जिहादचे असेच एक प्रकरण घडले. दोन १२-१५ वर्षाच्या मुली पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्या असता, १५ तास त्यांचा गुन्हा नोंदवून घेतला नाही. मध्यरात्री एक वाजेपर्यंत त्या पोलीस ठाण्याच्या बाहेर पडल्या.

Prasad Lad & Devendra Fadanvis
Sanjay Raut यांचे Rahul Narwekar यांना चॅलेंज, बघा काय म्हणाले? | Shivsena | 16 MLA Disqualification

मात्र सोमारच्या लोकांनी सांगताच २५ जणांविरोधात वगेच गुन्हा दाखल झाला. लागलीच पोलीसांनी काहींना अटकही केली. यामागे लव्ह जिहादचे रॅकेट आहे. त्याला पोलीस देखील साथ देतात. यात टेरर फंडीग होत असल्याचे पुरावे पुढे येत आहेत. यात आम्ही वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप झाल्यानंतर पोलीसांनी गुन्हा व कलम यात सुधारणा केली.

मशीदीवरील भोंगे बंद का होत नाहीत?, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, मुंब्रा येथे ११२ मशीदी आणि ४३ मदरसे आहेत. सर्वच्या सर्व विनापरवाना आहेत. तेथील युवकाने माझ्याकडे लाऊडस्पीकर बंद करा. माझ्या घरातील लहान बाळाला त्रास होतो, अशी तक्रार केली. मात्र त्यावर कारवाई होत नाही. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. महासंचालक स्तरावर निर्णय झाला. मात्र पोलीस म्हणतात, आमच्यापर्यंत काहीच निर्देश नाहीत.

Prasad Lad & Devendra Fadanvis
Nitin Desai To Eknath Shinde : नितीन देसाईंची 'ऑडिओ क्लिप' आली समोर; राज्य सरकारला केले 'हे' आवाहन

श्री. लाड यांनी पोलीसांना इशारा देताना सांगितले की, मशीदीवरील भोंगे बंद करण्यासाठी आता आम्हाला परत हनुमान चालीसा व राम आरती करावी लागेल का?. त्यांनी अतीशय तीक्ष्ण शब्दात विविध गंभीर आरोप करीत थेट पोलीसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडलं. त्यामुळे ही चर्चा चर्चेचा विषय ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com