Ahmednagar Lok Sabha Election : नगर जिल्ह्यातील काँग्रेसकडे एकही जागा नसताना, महाविकास आघाडीतील उमेदवारांना निवडणूक आणत ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात 'राजकीय किंग' ठरले आहेत. एक्झिट पोलनंतर भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थोरातांची शरम काढली होती. परंतु त्यावर मौन बाळगून थोरात यांनी विखेंसह नगर जिल्ह्यात भाजप, शिवसेना महायुतीची जिरवली. नीलेश लंके थोरातांना 'किंगमेकर' म्हणून त्यावर शिक्कामोर्तब केले.
नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवरच एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला यश दाखवले गेले होते. त्यावर भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संताप व्यक्त केला. मंत्री विखे यांनी यात बाळासाहेब थोरात यांना टार्गेट केले. काँग्रेसकडे जागा नसताना देखील दुसऱ्याची तळी उचलण्यात धन्यता मनतात, असे म्हणत विखे यांनी थोरातांना शरम वाटली पाहिजे, असे म्हटले होते. यावर थोरात प्रतिक्रिया देतील असे वाटत होते. परंतु ते शांत बसून राहिले. हा निकाल म्हणजे, नगर जिल्ह्यात विखेंबरोबर भाजपची जिरवली, असे म्हटले जात आहे.
नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी उमेदवारांच्या विजयात बाळासाहेब थोरातांनी महत्त्वाची भूमिका राहिली. त्यामुळे त्यांचे महाविकास आघाडीत वजन वाढले आहे. राज्यात महाविकास आघाडीचा सरकारनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला. लोकसभा निवडणुकीला समोरे जाताना महाविकास आघाडी राज्यात एकसंघ राहिली. त्यानुसार एखादी जागा वगळता सर्व जागा निश्चित झाल्या. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बाळासाहेब थोरात यांनी राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार जोरात केला. यात बाळासाहेब थोरातांनी होमग्राऊंडची जबाबदारी स्वीकारली. नीलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लंके यांनी शरद पवार यांच्यानंतर कोणाची भेट घेतली असेल ती, बाळासाहेब थोरात यांची! नीलेश लंके यांनी संगमनेर येथे त्यांच्या घरी जाऊन बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. भाऊसाहेब वाकचौरे देखील बाळासाहेब थोरातांचा हात पकडला.
नीलेश लंके यांच्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी उत्तरेकडील त्यांची यंत्रणा नगर दक्षिणमध्ये उतरवली होती. तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासाठी देखील थोरातांनी बरीच मेहनत घेतली. संघटन कौशल्य असलेल्या थोरातांनी महाविकास आघाडीच्या या दोन्ही उमेदवारांबाबत राजकीय मदतीच्या वेळी मदतीचा 'हात' आखडला नाही. परिणामी नगर जिल्ह्यात विखेंच्या वर्चस्वाला थोरातांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोराचा धक्का दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.