Vasant Gite News : भाजप नेत्यांचाच वसंत गितेंना पुन्हा आमदार करण्याचा निर्धार; आमदार फरांदेंच्या समर्थकांमध्ये नाराजी ?

Nashik BJP News: वसंत गिते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार ? भाजप नेत्यांच्या निर्धारामुळे चर्चांना उधाण
Devyani Pharande and Vasant Gite
Devyani Pharande and Vasant GiteSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात भाजपच्या नेत्यांनीच 'भाऊंना' अर्थात वसंत गितेंना आमदार करण्याचा निर्धार केल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे ठाकरे गटात देखील उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यांनी असा पवित्रा घेतल्याने आमदार फरांदे यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे.

नाशिक मध्य मतदारसंघात वसंत गिते यांचा पराभव करत भाजपच्या देवयानी फरांदे या आमदार झाल्या. तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून वसंत गिते यांच्याकडे पाहिले जाते. गिते सध्या आमदार नसले तरी नाशिक मर्चट्स को-ऑप बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे चिरंजीव प्रथमेश गिते हे भाजपचे उपमहापौर राहिले आहेत. वसंत गितेंनी शिवसेना सोडल्यानंतर मनसे आणि भाजपमध्ये काही काळ काम केले.

Devyani Pharande and Vasant Gite
Baban Gitte News: राष्ट्रवादीत प्रवेश करताच बबन गित्तेंना शरद पवारांचं मोठं गिफ्ट; सोपवली 'ही' जबाबदारी

दोन वर्षांपूर्वी गितेंनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांचे संबंध चांगले आहेत. नाशिक मर्चट्स को-ऑप बँकेत त्यांच्या स्नेहींनी अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याचवेळी वसंत गिते यांच्याबद्दल बोलताना अनेकांनी त्यांना आमदार करण्यासाठी पुन्हा सक्रीय होण्याचे आवाहन केले.

भाजपच्या काही नेत्यांनी असा पवित्रा घेतल्याने आमदार फरांदे यांचे समर्थक नाराज झाल्याचे बोलले जात आहे. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने वसंत गिते यांचे फ्लेक्स चौकाचौकात झळकले आहेत. तर या फ्लेक्सवर देखील भावी आमदार असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे वसंत गिते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचेही बोलले जात आहे. यातच भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत रंगलेला अभिष्टचिंतन सोहळा नाशिकमध्ये पुन्हा चर्चेचा ठरला आहे.

Devyani Pharande and Vasant Gite
Shirdi Lok Sabha News : शिर्डीच्या जागेवरुन ठाकरे गटात ठिणगी ; भाऊसाहेब वाकचौरेंच्या उमेदवारीला घोलपांचा विरोध

याबाबत बोलताना भाजप नेते आणि नाशिक मर्चट्स को-ऑप बँकेचे संचालक हेमंत धात्रक यांनी सांगितले की, "भाजप, शिवसेनेची युती असल्यापासून वसंतभाऊंची आणि आमची मैत्री आहे. मध्यंतरी ते भाजपमध्येही होते. आता 'नामको' बँकेच्या निमित्ताने आम्ही एकत्र काम करत आहोत. त्यांनी आता पक्ष बदलला आहे. याचा अर्थ आम्ही भाजप पक्षाशी प्रतारणा करतो, असा होत नाही. राजकीय पक्ष आणि वैयक्तिक मैत्री वेगळी असते. आमच्या भाषणाचा विपर्यास केला गेला", असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com