Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत राष्ट्रवादीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलेले बबन गित्ते यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बबन गित्ते यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करत या निवडीचे पत्रकही त्यांना देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीत प्रवेशावेळी बबन गित्ते यांनी बीड शहरात मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. बीड जिल्ह्यात बबन गित्ते यांचे मोठे प्रस्थ असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवरच त्यांनी येवला, बीड, कोल्हापूर या ठिकाणी सभा घेत आगामी रणनीती आखण्यास सुरवात केली.
पक्षातील फुटीनंतर धनंजय मुंडे यांनी अजितदादांना साथ देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीडमध्ये पक्षाला काहीसा फटका बसला. मात्र, आता शरद पवारांनी पक्षाचा मोहरा म्हणून गित्ते यांना मोठी ताकद देत त्यांची थेट पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वत: राज्यातील प्रत्येक विभागात जाऊन पक्ष संघटनेचा आढावा घेत आहेत. यातच काही नव्या चेहऱ्यांना पक्षात घेत संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) गणित नेमके कसे असणार, हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.