Jalgaon Elections : नगराध्यक्षपदासाठी कार्यकर्ते बाजूला; जळगावात महाजन-सावकारे-चव्हाण यांच्या ‘होम मिनिस्टर’ रिंगणात

Girish Mahajan, Sanjay Sawakare and Mangesh Chavan : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असं नेते मंडळी सांगतात. पण जिल्ह्यातील मंत्री-आमदारांनी तर आपल्याच पत्नी व मुलांना उमेदवारी दिल्याचे दिसते.
Girish Mahajan, Sanjay Savkare, Mangesh Chavan
Girish Mahajan, Sanjay Savkare, Mangesh ChavanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत असे सर्वच राजकीय मंत्री, आमदार सांगतात. मंत्री बहुतांश ठिकाणी कार्यकर्त्यांना दूर ठेवत मंत्री, स्थानिक आमदारांनी नगराध्यक्षपद घरात राखण्यासाठी पत्नी, मुलगा, मुलींना उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात १६ नगरपालिका व २ नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहे. यातील बहुतांश ठिकाणी महत्वाचे असलेले नगराध्यक्षपद आपल्या घरातच ठेवण्यासाठी मंत्री व आमदारांची धडपड दिसते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय नुसत्या संतरज्या उचलायच्या का ? असा सवाल उपस्थितीत केला जातो आहे.

यामध्ये विशेषत: जळगाव जिल्ह्याचे नेते व भाजपचे संकटमोचक समजले जाणारे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरातून नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांना रिंगणात उतरवले आहे. तसेच, तिकडे भुसावळला देखील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही प्रथमच पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी पत्नी रजनी सावकारे यांना उमेदवारी दिली आहे.

Girish Mahajan, Sanjay Savkare, Mangesh Chavan
Unmesh Patil : भाजप ही गांडूळाची...' जळगावमधील उद्धव ठाकरेंचा नेता घराणेशाहीवरुन घसरला..

मंत्र्यापाठोपाठ आमदारांनीही तोच कित्ता गिरवल्याचे दिसत आहे. चाळीसगावात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्नी प्रतिभा यांना मैदानात उतरवले, तर पाचोऱ्यात शिवसेना आमदार किशोर पाटील यांनीही पत्नी सुनीता यांना नगराध्यक्षपदाची तर मुलालाही नगरसेवक म्हणून निवडणुकीत उभे केले आहे.

Girish Mahajan, Sanjay Savkare, Mangesh Chavan
Nashik Politics : गिरीश महाजनांचा दादा भुसे यांना डबल झटका; शिंदेंच्या आणखी एका मंत्र्याचे घरातच अस्तित्वच धोक्यात!

मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुलगी संजना यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमळनेर येथील माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील या नगरसेवक म्हणून निवडणूक लढवीत आहेत. तर पारोळ्यात माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या स्नुषा वर्षा रोहन पाटील, तसेच माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या पत्नी अंजली पवार या निवडणुकीत नगरसेवकपदाच्या शर्यतीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com