Onion Export Ban : भाजपाने निवडणुकीच्या धास्तीने उठवली कांदा निर्यातबंदी?

BJP Politics : केंद्र शासनाने उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.
Onion Export Ban and Politics
Onion Export Ban and PoliticsSarkarnama

Loksabha Election 2024 : गेले दोन महिने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसानीस कारणीभूत ठरलेला निर्यात बंदीचा निर्णय रविवारी अखेर भाजपने मागे घेतला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

कृषी आणि पणन विभागाच्या राष्ट्रीय धोरणानुसार वेळोवेळी शेतीमालाच्या किमतीचा आढावा घेऊन निर्यात बंदी आणि निर्यातीवरील कर कमी किंवा जास्त करण्याचा निर्णय केंद्र शासन घेत असते. त्यानुसार रविवारी झालेल्या आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यातीला मंजुरी देण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Onion Export Ban and Politics
Mahayuti Seats Allotment : नाशिक राष्ट्रवादीकडे; छगन भुजबळ लढवणार लोकसभा?

जानेवारी महिन्यात केंद्र शासनाने देशातील कांदा निर्यातीवर 40 टक्के कर लावला होता. त्यानंतर निर्यात बंदीचा निर्णय घेण्यात आला या निर्णयावर अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकीवर त्याचा अतिशय गंभीर परिणाम होऊ शकला असता.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघासह राज्यातील अन्य चार लोकसभा मतदारसंघांवर कांदा निर्यात बंदीचा मोठा परिणाम झाला होता. याबाबत झालेल्या राजकीय सर्वेक्षणात डॉ. भारती पवार(Bharti Pawar) यांची जागा देखील धोक्यात आल्याचा अहवाल होता. या पार्श्वभूमीवर आज कांदा निर्यात बंदी रद्द करून निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाने दिंडोरी मतदार संघातील भारती पवार यांना दिलासा मिळेल, असा भाजपचा विश्वास आहे.

Onion Export Ban and Politics
BJP On Nashik Lok Sabha Constituency :भाजपचा गेम प्लान... शिंदे, अजित पवार गटाचे धाबे दणाणले

केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला तेव्हा कांद्याचे दर सुमारे 40 रुपये प्रति किलो होते. सध्या हे दर आठ रुपयांवर आले आहे मधल्या काळात शेतकऱ्यांचे सुमारे दोन हजार कोटी घेऊन अधिकचे आर्थिक नुकसान झाले आहे. या कालावधीत भाजपाशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत कांदा खरेदी आणि विक्री करण्यात येत होती.

शिवाय भाजपाच्या नेत्यांशी संबंधित या कंपन्यातून मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी देखील आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होईल याविषयी राजकीय तज्ञांमध्ये मतभिन्नता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com