
Mangesh Chavan : मंत्री गिरीश महाजन यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासातील सहकारी चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मंत्री गिरीश महाजन यांच्याप्रमाणेच आमदार चव्हाण हे सुद्दा हौशी आहेत. अधुनमधून ते आपली ड्रायव्हिंगची हौस देखील भागवित असतात. मागे एकदा तर त्यांनी कन्नड घाटात स्वतः ट्रक चालवला होता.
केवळ हौस भागवायची म्हणून नव्हे तर मंगेश चव्हाण यांनी ट्रक ड्रायव्हर बनून मोठं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. कन्नड घाटामधून जाताना प्रत्येक अवजड वाहनचालकाकडून पोलिस बेकायदेशी पैसे घेत असल्याचे त्यांनी उघड केले होते. त्यांनी यासंदर्भातील काही व्हिडीओही त्यांच्या फेसबुकवर शेअर केले होते. चव्हाण यांनी स्वत:ट्रक चालक बनून पोलिसांच्या बेकायदेशीर वसुलीचा पर्दाफाश केला होता.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चाळीसगाव आगारात शनिवारी (दि. ९) पाच नवीन बीएस ६ प्रकारच्या बसेस दाखल झाल्या. त्यांचे लोकार्पण करण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. विशेष म्हणजे, आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी स्वत:बस चालवून या नव्या सेवेचा शुभारंभ केला. त्याचे फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.
आगारात यापूर्वीच ५ बसेस दाखल झाल्या होत्या. रक्षाबंधनाच्या शुभमुर्हतावर आणखी पाच बसेस दाखल झाल्या. आता चाळीसगाव आगाराकडे एकुण १० नवीन बस आहेत. याचबरोबर, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे काम प्रगतीपथावर असून लवकरच अत्याधुनिक ई-शिवाई इलेक्ट्रिक बसेस देखील आपल्या सेवेत दाखल होणार आहेत. चाळीसगाव बस स्थानकाचे संपूर्ण रूप पालटून, एअरपोर्ट दर्जाचे भव्य व प्रशस्त बस स्थानक बांधण्यासाठी टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही वर्षांत हेही काम पूर्ण होऊन हजारो प्रवाशांची सोय होणार आहे. अशी माहिती भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून बस संख्येअभावी प्रवासी व विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या समस्येवर तोडगा निघावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज त्याचे फलित पाहून समाधान वाटल्याचं चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.