BJP Vs Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेस चव्हाण यांच्यातील दूध संघाचे राजकारण शमलेले नाही. मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यामुळेच दूध संघ तोट्यात आहे, तो तोटा भरून काढण्याचेकाम आम्ही करीत आहोत, असा आरोप केला आहे. (BJP & NCP Politics on Jalgaon cooperative Milk federation)
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भाजपचे (BJP) सर्व नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता दूध संघाच्या निमित्ताने आमदार चव्हाण यांनी खडसे यांना विकासावर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.
यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी दूध संघाच्या कामकाजाबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, राष्ट्रवादीतर्फे काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चावर देखील टिका केली. ते म्हणाले, खडसे यांनी जनआक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नव्हता, तो खडसे यांच्यासाठीच होता. खडसे सध्या गौण खनिज व दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणात पूर्णपणे अडकले आहेत. त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चा हा त्यांना व त्यांच्या परिवार वाचविण्यासाठीच होता.
शेतकऱ्यांसाठी त्यांनी हा मोर्चा काढलाच नव्हता. खडसे यांचा विकासाचा कोणताही दृष्टिकोन नव्हता, त्यामुळे जिल्ह्याचा कोणताही विकास केला नाही. आपले त्यांना आव्हान आहे, की त्यांनी विकासावर चर्चा करावी. त्यांचा तीस वर्षांचा कालावधी आपला केवळ तीस महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे त्यांनी त्यावर केव्हाही चर्चा करावी. त्याला आपली तयारी आहे. खडसे यांनी कोणताही विकास केलेला नाही. जळगाव जिल्ह्याला लागलेले ते ग्रहण आहे, असा आरोपही त्यांनी केला.
जळगाव जिल्हा दूध संघात सत्तेवर असलेल्या मागील खडसे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधाऱ्यांनी तब्बल नऊ कोटी ६० लाख रुपयांचा तोटा केला होता. तो भरून काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या वर्षी चार कोटी २४ लाख रुपये नफा मिळवून सहा कोटी ७२ लाखापर्यंत नफा कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. येत्या वर्षभरात दूध संघाला सुस्थितीत आणले जाईल, असे आमदार चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.