Maratha Reservation: जरांगे पाटील यांनी आमदार सोळंकेंना चांगलेच फैलावर घेतले!

Maratha Reservation Issue, Manoj Jarange Patil Criticized MLA Prakash Solanke-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके समाजाबद्दल काड्या करतात, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
MLA Prakash Solanke & Manoj Jarange Patil
MLA Prakash Solanke & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

दत्ता देशमुख

Maratha Reservation Politics : बीड येथे झालेल्या कार्यक्रमात मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकास सोळंके यांना चांगलेच फैलावर घेतले. जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणातच थेट सोळंके यांना लक्ष्य केल्याने सोळंके बचावात्मक स्थितीत आहेत. (NCP MLA Prakash Solanke is on Manoj Jarange`s Target)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सोळंके यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये मराठा आरक्षणाबाबतचा (Maratha Reservation) संवाद आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सोळंके यांच्यावर टीका केली.

MLA Prakash Solanke & Manoj Jarange Patil
Maratha Reservation: जरांगे पाटील यांचा आज खानदेशमध्ये विक्रम, एकाच दिवशी चार सभा!

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी (जालना) येथे दुसऱ्या टप्प्यातील उपोषण सुरू असताना माजलगाव मतदारसंघातील एका कार्यकर्त्याने आमदार सोळंके यांना फोन केला होता. त्या संवादात मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्याविषयी विचारणा केल्यावर आमदार सोळंके यांनी जरांगे पाटील यांच्याविषयी उपहासात्मक टिप्पणी केली. त्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप व्हायरल झाल्यावर मराठा समाजाच्या आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

माजलगाव येथे ३० ऑक्टोबरला आमदार सोळंके यांच्या घरावर दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांत आंदोलन, तोडफोड आणि जिवे मारण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, त्याआधीच ऑडिओ क्लिप तयार करून समाजात आपल्याबद्दल संताप असल्याचे लक्षात आल्याने क्लिपचा चुकीचा अर्थ काढल्याचे सांगत आपण मनोज जरांगे पाटील यांना भेटणार असल्याचे आमदार सोळंके यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केले. याच पत्रकार परिषदेत आपली कोणाविरुद्धही तक्रार नसून समाजाच्या आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले होते. आमदार प्रकाश सोळंके यांनी छत्रपती संभाजीनगरला उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.

मात्र, जाळपोळ व दगडफेक प्रकरणात दाखल गुन्ह्यात राजकीय हेतूने प्रेरित नावे समाविष्ट केली जात असल्याचा सुरुवातीपासून आरोप आहे. याबाबतच्या तक्रारी अद्यापही कमी झालेल्या नाहीत. काही मंडळी आपल्या विरोधकांची नावे पोलिसांना पुरवत आहेत. पोलिस निरीक्षकदेखील सत्ताधारी नेत्यांना हवी तशीच भूमिका घेत असल्याच्या तक्रारी आहेत.

MLA Prakash Solanke & Manoj Jarange Patil
Assembly Elections Results 2023 : दिग्गजांचे राजकीय भवितव्य टांगणीला, मतमोजणीचे कल पाहून अनेकांची धडधड वाढली

याबाबत जरांगे पाटील यांनी जालना येथील सभेत हा मुद्दा मांडला. त्यांनी आमदार सोळंके यांना चांगलेच फैलावर घेतले. एकीकडे माजलगावचे आमदार येऊन आमचे पाय धरतात आणि दुसरीकडे पोलिसांकडे काड्या करतात असा थेट आरोप त्यांनी केला. ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्याला गेल्या बारा दिवसांपासून कोठडीत डांबल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितल्याने आमदार सोळंके जरांगे पाटलांचे लक्ष्य झाल्याने पुन्हा एकदा सोळंके यांचे टेन्शन वाढले आहे.

MLA Prakash Solanke & Manoj Jarange Patil
Telangana Election Result 2023 : केसीआर हॅटट्रिक करणार का ? काँग्रेसने 'असे' दिले आव्हान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com