Assembly Elections Results 2023 : दिग्गजांचे राजकीय भवितव्य टांगणीला, मतमोजणीचे कल पाहून अनेकांची धडधड वाढली

Assembly Elections Results 2023 : विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मतमोजणी सुरू झाल्याने उत्सुकता वाढली आहे...
Assembly Elections Results 2023
Assembly Elections Results 2023Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Elections Results in Marathi : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणात विधानसभा निवणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल मतांमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. २०२४ च्या लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या निवडणुकांत तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे.

Assembly Elections Results 2023
Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

रविवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. ही चारही राज्ये काँग्रेस आणि भाजपने पिंजून काढली होती. मध्य प्रदेशात अँटी इन्कमबन्सीचा फायदा मिळून आपली सत्ता येईल असे काँग्रेसला वाटत असून, भाजपलाही पुनरागमनाचा विश्वास आहे. मध्य प्रदेशात भाजप २००३ पासून सत्तेत आहे. राजस्थानात दर पाच वर्षांनी सरकार बदलते. ( Assembly Elections Results 2023 ) यंदा सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने भाजपवर किंचित आघाडी घेतल्याचे चित्र आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचे चित्र कायम राहिले तर तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची सत्ता धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. तेलंगणात खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमएआयएम पक्षाला एक-दोन जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे. एमआयएम केवळ नऊ जागांवर निवडणूक लढवत आहे.

मध्य प्रदेशात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येणार असल्याचे दाखवले होते. इंडिया टुडे - अॅक्सिस माय पोलने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला १४० ते १६२ जागा दिल्या होत्या. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना बरोबरीचा दिसत होता. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कमलनाथ यांच्यासह दोन्ही पक्षांतील काही ज्येष्ठ नेत्यांचे राजकीय भवितव्य निश्चित करणारी ही निवडणूक समजली जात आहे. सलग चार टर्म मुख्यमंत्री राहिलेले चौहान यांनी अँटी इन्कमबन्सीवर मात केली की नाही, हे थोड्या वेळातच स्पष्ट होणार आहे. ( Five State Assembly Elections Result in Marathi )

सकाळी आठ वाजता मतमोजणी सरू झाली. आठ ते साडआठपर्यंत पोस्टल मतांची मोजणी झाली. त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सुरू करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता मध्य प्रदेश वगळता राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेसने आघाडी घेतली होती. मध्य प्रदेशात भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू केल्याचे चित्र होते. राजस्थानात काँग्रेस भाजपपेक्षा किंचित पुढे तर छत्तीसगड आणि तेलंगणात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल सुरू केल्याचे चित्र आहे.

Assembly Elections Results 2023
Telangana Chhattisgarh Assembly Results : बीआरएसच्या गडाला सुरुंग; काँग्रेसनं तेलंगणा खेचलं; छत्तीसगडची सत्ता गमावली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com