Dhule News: धुळे तालुक्यासाठी मंजूर ४२ कोटींच्या निधीतील रस्तेकामी दिलेली स्थिगिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेला पाठपुरावा व पत्रव्यवहारामुळे उठली. महाविकास आघाडी सरकारने घिसाडघाईतून वाटप केलेल्या निधीला स्थगिती देण्यात आली होती. स्थगिती उठवून निधी मिळवण्यासाठी मी पत्रव्यावहार केला होता. त्यामुळे काँग्रेसचे आमदार कृणाल पाटील यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, अशी टिका भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली. (Dr. Bhamre claims credit of Dhule Rural Funds)
महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) हा निधी मंजूर केला होता. त्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार आल्यावर स्थगिती देण्यात आली होती. तो व्यपगत होऊन अन्यत्र वळविला जाणार होता. तसे होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्र्यांची मदत घेतल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी दिली.
आमदार कुणाल पाटील यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, असा सल्ला देत डॉ. भामरे यांनी सांगितले, की राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार नऊ महिन्यांपूर्वी कोसळणार असल्याची स्थिती असताना महाविकास आघाडी सरकारने घिसाडघाईने मोठ्या प्रमाणात आमदारांना निधीचे वाटप केले. (Latest Political News)
मात्र, परिवर्तनानंतर शिंदे-फडणवीस सरकारने या निधीवाटपाच्या प्रक्रियेला सरसकट स्थगिती दिली. त्यात धुळे तालुक्यासाठी दिलेल्या ४२ कोटींच्या निधीचा समावेश होता. हा निधी लॅप्स होण्याची किंवा दुसरीकडे वळविला जाण्याची शक्यता होती.
स्थगितीमुळे धुळे तालुक्यातील रस्तेकामांवर परिणाम होऊ शकतो हे लक्षात आल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली व पत्र दिले. त्यात रस्तेकामी ४२ कोटींच्या निधीला दिलेली स्थगिती हटवून प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा नुकसान होईल या मुद्द्याकडे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्र्यांनी या पत्रावर योग्य त्या कार्यवाहीचा शेरा मारला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य ती सूचना दिली. मंत्रालयीन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत निधीवरील स्थगिती उठविली आणि रस्तेकामी प्रश्न मार्गी लावला आहे, असे डॉ. भामरे यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.