दादागिरी खपवून घेणार नाही! सोमय्या प्रकरणावरून रक्षा खडसेंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

किरीट सोमय्यांना पुण्यात खाली पाडून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
Raksha Khadse
Raksha Khadse Sarkarnama
Published on
Updated on

जळगाव : भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याशी पुणे महापालिकेत (PMC) शिवसैनिकांशी झटापट झाली होती. यावरून भाजप विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा वाद पेटला आहे. यात आता भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, राज्यात सध्या चुकीचे राजकारण सुरू आहे. किरीट सोमय्यांना पुण्यात खाली पाडून त्यांचा खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे अतिशय चुकीचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहे. त्यांचे कार्यकर्ते मात्र, दादागिरी करीत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही.

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीली परवानगी दिली आहे. यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी कर कपात करण्याची वेळ येते, त्यावेळी सरकार वाईन विक्रीली परवानगी देत आहे. राज्यातील जनतेची खरोखरच महाविकास आघाडी सरकारला चिंता असल्याचे दिसत नाही. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करून एक पाऊल मागे घेतले. आता राज्य सरकारनेही कर कमी करावा. कोरोनाच्या काळातही वाईन विक्रीबाबतचा असा निर्णय घेणे चुकीचे आहे. राज्यात महिला दारूबंदीसाठी आंदोलन करीत आहेत. याचवेळी सरकार मात्र, दारुविक्रीला परवानगी देत आहे.

Raksha Khadse
रुग्णालयातून सुटताच जखमी किरीट सोमय्यांनी फोडली डरकाळी; म्हणाले...

सोमय्या हे 5 फेब्रवारीला महापालिकेत आले असतानाता शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. संतापलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या कारच्या काचांवर हाताने ठोसे मारत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. मात्र आक्रमक शिवसैनिकांशी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या अक्षरश: महापालिकेच्या पायऱ्यांवर पडले. किरीट सोमय्याच्या सुरक्षारक्षकांनी शिवसैनिकांना बाजूला करत त्यांना बाहेर काढले. दरम्यान, यावेळी झालेल्या झटापटीमुळे महापालिकेच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाला होता.

Raksha Khadse
फटेनंतर आता कट्टे! शेअर बाजारात दाम दुप्पटच्या नावाखाली लावला चुना

या झटापटीत जखमी झालेल्या सोमय्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 6 फेब्रुवारीला रुग्णालयातून सोडण्यात आले. नंतर हाताला बँडेज लावलेल्या अवस्थेत व्हीलचेअरवरून सोमय्या रुग्णालयातून थेट पुणे महापालिकेत पोचले होते. आधीचा प्रकार लक्षात घेता सोमय्यांच्या झेड सुरक्षेसोबत मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती. सोमय्यांनी जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहाराची तक्रार करुन लगेच ते तिथून निघून गेले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com