फटेनंतर आता कट्टे! शेअर बाजारात दाम दुप्पटच्या नावाखाली लावला चुना

बार्शीनंतर पंढरपुरातील नागरिकांना दामदुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.
Prathamesh katte
Prathamesh katteSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याने केलेल्या फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. यातच आता सोलापुरात आणखी एक असाच मोठा घोटाळा समोर आला आहे. बार्शीनंतर पंढरपुरातील नागरिकांना शेअर बाजाराच्या (Share Market) माध्यमातून दामदुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार संकल्प पतसंस्थेचा अध्यक्ष प्रथमेश कट्टे (Prathamesh Katte) हा आहे.

पंढरपुरातील या घोटाळ्या प्रकरणी पहिली तक्रार दाखल झाली आहे. सुनिल दशरथ भिसे या पंढरपुरातील नागरिकाने ही तक्रार केली आहे. भिसे हा मेकॅनिक असून, त्याला 15 लाख रुपयांचा गंडा कट्टे याने घातला आहे. भिसेच्या तक्रारीनंतर कट्टे याचा घोटाळा समोर आला असून, शहरात खळबळ उडाली आहे. कट्टे हा संकल्प पतसंस्था चालवतो. कट्टेची पतसंस्था सध्या बंद असल्याचे समजते. कट्टेसह त्याचा साथीदार शुभम कोरके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

कट्टेने शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले होते. भिसे आणि कट्टेची आधीपासून ओळख होती. शेती खरेदी करण्याची इच्छा भिसेने कट्टेकडे बोलून दाखवली होती. याचा फायदा घेत कट्टे आणि शुभम कोरके यांनी शेअर बाजारात पैसे गुंतवून दुप्पट करण्याचे आमिष भिसेला दाखवले. यासाठी त्यांनी भिसेला एचडीएफसी बँकेतून 15 लाखाचे कर्ज मिळवून दिले. भिसेने हे पैसे 9 सप्टेंबर 2019 रोजी कट्टेच्या खात्यावर जमा केले. मात्र कट्टेने पैसे परत न केले नाहीत. कट्टेकडे पैसे मागितल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. यानंतर भिसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Prathamesh Katte News)

Prathamesh katte
नितेश राणेंच्या अडचणी संपेनात; सरकारी वकिलांची सही नसल्याचा बसला फटका

फटेच्या फसवणुकीचा आकडा वाढताच

दरम्यान, विशाल फटे याच्या विरोधात तक्रारींचा ओघ सुरू आहे. त्याने फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत त्याच्या विरोधात 129 जणांच्या तक्रारी आल्या असून, फसवणुकीची रक्कम तब्बल 25 कोटी रुपयांवर गेली आहे. गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढत असल्याने पोलीसही चक्रावले आहेत. दरम्यान, फटेच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. (Vishal Phate Scam)

Prathamesh katte
'ट्रॅफिकमुळे घटस्फोट' या अमृता फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले...

शेअर बाजारात पैसे गुंतवून कमी कालावधीत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष विशाल फटने गुंतवणूकदारांना दाखविले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास बसेपर्यंत सुरवातीला तो सुरवातीला पैसे परत करत होता. तो एकाकडून घेतलेले पैसे दुसऱ्या गुंतवणूकदाराला देत असे. या पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक न करताही पैसे फिरवत होता. नंतर गुंतवणूकदार वाढल्यानंतर हे त्याच्यासाठी अशक्य झाले. अखेर तो सगळे सोडून फरार झाला होता. फटेच्या विरोधात तक्रार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, फसवणुकीचा आकडाही वाढत आहे. आता हा आकडा तब्बल 25 कोटी रुपयांवर गेला आहे. त्याने हे पैसे नेमके कुठे घालवले याचा शोध पोलीस घेत आहेत. (Barshi Scam)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com