Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांच्या उमेदवारीची संघाकडून होतेय चाचपणी?

Lok Sabha Election : भाजपचा अजेंडा म्हणून भुजबळ यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यभर भाजप ओबीसी समाजाचा हितचिंतक असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असेल
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Loksabha 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघात ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुतीची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र, भाजपमध्ये अनेक इच्छुक असल्याने त्यांनी आता डावपेच सुरू केले आहेत. त्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी केली जात आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून उमेदवारीचे संकेत आहेत. या उमेदवारासाठी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपचा अजेंडा म्हणून भुजबळ यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यभर भाजप ओबीसी समाजाचा हितचिंतक असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असेल. मात्र, या उमेदवारीचे विविध पडसाद उमटले आहेत.

Chhagan Bhujbal
Dhule Constituency 2024: धुळे मतदारसंघासाठी चंद्रकांत रघुवंशी यांना आग्रह !

गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींची संपर्क करून भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत मतप्रवाह जाणून घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी नाशिक मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची थेट संपर्क साधला जात आहे. त्यांच्याकडून भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत फीडबॅक घेतला जात आहे. संघाकडून स्वतंत्र यंत्रणेमार्फत माहिती घेतली जात आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराबाबत अचानक नवी चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाकडे नाशिक साठी माजी सभागृहनेते दिनकर पाटील, लोकसभा मतदारसंघ प्रमुख केदा आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले असे विविध इच्छुक उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी नाशिक मतदारसंघ आपल्यालाच मिळावा, यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न केले होते. त्यात त्यांना यश आले नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा काही इच्छुक उमेदवार थेट खासदार हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. अचानक झालेल्या या बदलाने महायुतीच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भुजबळ यांना उमेदवारी दिल्यास महायुतीकडून एक प्रबळ उमेदवार मैदानात असेल. भुजबळ यांना ओबीसी समाजाचा एकगठ्ठा पाठिंबा आहे. अशा स्थितीत अन्य समाज घटकांचीदेखील भुजबळांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्याकडे निवडणुकीसाठी अत्यंत कार्यक्षम यंत्रणादेखील आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होऊ शकेल. मात्र, भाजपमधील काही इच्छुकांनी भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या वरिष्ठांना नकारात्मक माहिती सातत्याने पाठविली आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीचा नवा सर्वे सुरू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

R

Chhagan Bhujbal
Babanrao Gholap News : शिंदे गटात गेल्यावर घोलप म्हणाले, "नार्वेकर हा तर एक शिपाई माणूस.."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com