Dhule Constituency 2024: धुळे मतदारसंघासाठी चंद्रकांत रघुवंशी यांना आग्रह !

Congress-Shivsena politics : काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याने नंदूरबारचे नगराध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी पदाधिकाऱ्यांचा संपर्क
chandrakanat raghuvanshi
chandrakanat raghuvanshiSarkarnama
Published on
Updated on

Mahavikas Aghadi Politics : धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. प्रबळ उमेदवार नसल्याने सध्या धुळ्यासाठी अतिशय जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. यामध्ये काल अचानक दोन मोठी नावे चर्चेत आली आहेत.

धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसकडे गेला आहे. मात्र, या पक्षाकडे प्रबळ उमेदवार नाही. प्रयत्न करूनही त्यांना असा उमेदवार मिळालेला नाही. त्यामुळे सध्या श्याम समीर (धुळे) आणि डॉ. तुषार शेवाळे (मालेगाव) या व्यतिरिक्त नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभाताई बच्छाव यांचे नाव पुढे आले आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करून आपला अहवाल प्रदेशाध्यक्षांना पाठविला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

chandrakanat raghuvanshi
Babanrao Gholap News : शिंदे गटात गेल्यावर घोलप म्हणाले, "नार्वेकर हा तर एक शिपाई माणूस.."

काँग्रेसची (Congress) अशी स्थिती असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. यासंदर्भात दोन दिवसांपासून पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे नावदेखील घेतले जात आहे. तांबे सध्या परदेशात आहेत. ते आज परतण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी डॉ. तांबे लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुक नाहीत असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नंदूरबारचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या शिवसेनेच्या शिंदे गटात असलेले चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आहे. रघुवंशी यांनी होकार कळविल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांची संपर्क केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाने (BJP) धुळे मतदारसंघासाठी विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे डॉ. भामरे यांनी आपला प्रचारदेखील सुरू केला आहे. त्यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचे काम सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीनेदेखील निवृत्त पोलिस अधिकारी अब्दुल रहमान यांची उमेदवारी जाहीर केली आहे, अशा स्थितीत काँग्रेसचे घोडे मात्र उमेदवार मिळत नसल्याने आडले आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

chandrakanat raghuvanshi
Lok Sabha Election: लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का! 5 वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री शिंदे गटात प्रवेश करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com