Babanrao Gholap News : शिंदे गटात गेल्यावर घोलप म्हणाले, "नार्वेकर हा तर एक शिपाई माणूस.."

Lok Sabha Election 2024 : मिलिंद नार्वेकर कोण आहेत, असा प्रश्न करून त्यांचेच का ऐकून घेतले जाते?
Babanrao Gholap News
Babanrao Gholap NewsSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी दोन महिन्यांपूर्वी ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यांनी आज शिवसेनेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे ठाकरे गटाला ऐन लोकसभा निवडणुकीत धक्का बसला आहे. (Lok Sabha Election 2024)

घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क नेते होते. त्यांनी या मतदारसंघात विविध नियुक्ती केल्या होत्या. या नियुक्त्यांबाबत तक्रारी आल्याने शिवसेनेने त्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे नाराज झालेले घोलप यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची तीन महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. तेव्हापासून ते शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगत होत्या. अखेर आज त्या चर्चेला वास्तव स्वरूप आले आहे.

Babanrao Gholap News
BJP V/s Congress : निरुपम यांची भाजपची वाट खडतर? मोहित कंबोज म्हणाले, 'काँग्रेसचा कचरा...'

घोलप आज सायंकाळी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पत्रकारांची संवाद साधला. दोन महिन्यांपूर्वी मी पक्षाचा राजीनामा दिला होता मात्र या दोन महिन्यांच्या कालावधीत माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही. मी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे आपली कैफियत मांडली होती. त्यांनी मी तुमची वकिली करेन, असे सांगितले होते. मात्र त्यांनी काहीही केले नाही, अशी नाराजी घोलप यांनी व्यक्त केली.

Babanrao Gholap News
Lok Sabha Election 2024 : वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर

घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त केली. मिलिंद नार्वेकर कोण आहेत, असा प्रश्न करून त्यांचेच का ऐकून घेतले जाते? तो एक शिपाई माणूस आहे, त्याचे ऐकून घेतात. मग आम्ही पन्नास वर्षे शिवसेनेसाठी काम केले, आमचं का ऐकून घेतलं जात नाही? अशी नाराजी व्यक्त केली. शिवसेना पक्ष फुटतो तरी देखील नार्वेकर यांचेच का ऐकले जाते?. त्यांना एवढं महत्त्व का? असा प्रश्न घोलप यांनी नार्वेकर यांच्याबाबत उपस्थित केला.

Babanrao Gholap News
Sanjay Kokate Join NCP : 'संजय कोकाटे, राष्ट्रवादी बळकट करा; माढ्यातून तुमचा सूर्य तुतारीच्या नावाने उगवेल'

लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीच्या धामधुमीत माजी मंत्री घोलप यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. ते शिंदे गटात दाखल होणार असल्याने नाशिकमध्ये शिंदे गटाला मदत होईल. श्रीगोंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघात संघटन केले आहे. त्यामुळे ते शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार लोखंडे यांच्या मदतीला जाण्याचे शक्यता आहे. अशा स्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com