Eknath Shinde Politics: काय चालललय काय? मतदारांपेक्षा महायुतीतील पक्षांचे सदस्य अधिक!

BJP politics; Shivsena Shinde set target of 5 lakh members in Nashik- राजकीय पक्षांची सदस्य नोंदणीसाठी स्पर्धा सुरू असल्याने त्याची चर्चा.
Eknath shinde & devendra Fadanvis
Eknath shinde & devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

BJP, Shivsena News: भारतीय जनता पक्षातर्फे सध्या सदस्य नोंदणी सुरू आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानेही सदस्य नोंदणीचे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी मोठी मोठी टार्गेट निश्चित करण्यात आली आहेत.

गेल्या महिन्यात शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक झाली. त्याआधी शिर्डीत भाजपची देखील बैठक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी म्हणून त्यात विविध सूचना करण्यात आल्या.

Eknath shinde & devendra Fadanvis
Eknath Shinde politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत नीलमताई गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या...

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही, याबाबत राजकीय जाणकार साशंक आहेत. सध्या सर्वच महापालिका आणि मोठ्या संस्थांवर प्रशासक नियुक्त आहेत. या प्रशासकांच्या माध्यमातून थेट राज्य सरकार आणि त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्री कारभार करीत आहेत.

Eknath shinde & devendra Fadanvis
Dada Bhuse Politics: दादा भुसे संतापले, म्हणाले, 'ते' संजय राऊत यांना चांगले ठाऊक!

त्यात सर्व काही सत्ताधाऱ्यांच्या सोयीने होत आहे. त्यामुळे निवडणुका झाल्यास हे सर्व बंद होऊ शकते. त्यामुळे खरोखर राज्यातील महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात, असे वाटते का? याविषयी शंका असलेला एक मोठा वर्ग राज्यात आहे.

ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत. हे कारण सांगून गेले काही वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधांतरी आहेत. मात्र खरोखर न्यायालयाच्या या याचिकांमुळे निवडणुका घेऊ नये, असे आदेश आहेत का?. याबाबत देखील अनेक शासन को काय आहेत. सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांना देखील हीच शंका वाटत आहे.

या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणीची मोहीम सध्या सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने त्यासाठी टोल फ्री नंबर देखील दिला आहे. सर्व लोकप्रतिनिधी त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार करीत आहेत. यापूर्वी पाच लाख सदस्य असल्याचा भाजपचा दावा आहे. आता शिवसेना शिंदे पक्षाने देखील पाच लाख सदस्य नोंदविण्याचे टार्गेट दिले आहे. अजित पवार पक्षालाही त्यापेक्षा कमी टार्गेट घेऊन कसे चालेल?.

नाशिक जिल्ह्यातील मतदारांचा एकंदरीत विचार करता सत्ताधारी राजकीय पक्षाने सदस्य नोंदणीचे जाहीर केलेले उद्दिष्ट अनेक शंका निर्माण करून जाते. केवळ सत्ताधारी तीन पक्ष १५ लाख सदस्य नोंदणी करणार असतील, तर राज्यातील अन्य पक्षांच्या सदस्यांची संख्या किती असेल? संख्या किती याचाही प्रश्न पडतो.

याचा एक अर्थ एवढी लाखो सदस्य असलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते किती?. याचा विचार केला तर प्रत्येक घरात राजकीय पक्षांचे सदस्य होणार आहेत थोडक्यात काय तर नाशिकच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक नागरिकाला सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोणाचे तरी सदस्य व्हावे लागणार आहे. प्रत्यक्षात पाच दहा टक्क्यांपेक्षा अधिक लोक राजकीय पक्षांच्या भानगडीत पडत नाहीत. मग एवढे सदस्य होणार कुठून? हा एक नवा चर्चेचा विषय नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com