Dada Bhuse Politics: दादा भुसे संतापले, म्हणाले, 'ते' संजय राऊत यांना चांगले ठाऊक!

Dada Bhuse; Bhuse criticize Sanjay Raut on CM fadnavis Varsha bungalow-शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याची तयारी
Dada Bhuse & Sanjay Raut
Dada Bhuse & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा निवासस्थानी राहायला गेलेले नाहीत. त्यांनी आपले जुने निवासस्थान कायम ठेवले आहे. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने टीका केली होती.

महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावरून आता वाद रंगला आहे. मात्र भाजप यापासून अलिप्त आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांमध्येच यावरून एकमेकांना टोमणे मारले जात आहेत.

Dada Bhuse & Sanjay Raut
Eknath Shinde politics: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजी बाबत नीलमताई गोऱ्हे स्पष्टच म्हणाल्या...

शिक्षण मंत्री दादा भुसे यासंदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच भडकले. मुख्यमंत्री फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावर राहायला गेलेले नाहीत. मात्र ते लवकरच जातील. त्याचा निर्णय ते योग्य वेळी घेतील, असे भुसे म्हणाले.

Dada Bhuse & Sanjay Raut
Radhakrishna Vikhe : राहुल गांधींनी शिर्डीतील 'त्या' 7 हजार मतांचा मुद्दा काढताच विखेंचा पारा चढला; म्हणाले, 'त्यांनी जो शोध लावलाय...'

या संदर्भात शिवसेना नेते राऊत यांचा उल्लेख त्यांनी "सकाळचा भोंगा" असा केला. ते म्हणाले, गंडेदोरे, लिंबू- मिरची असले प्रकार `सकाळच्या भोंग्याला` चांगले माहित आहेत. त्यामुळेच ते अशी विधाने करतात. कारण त्यांच्याकडे बोलायला जनतेच्या कोणत्याच समस्या राहिलेल्या नसाव्यात.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने सत्तेत आल्यावर जनतेसाठी विविध लोकोपयोगी कामे केली आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा थेट जनतेशी कनेक्ट आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आम्हाला मोठे यश मिळाले. त्यासाठी जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री राज्याच्या विविध भागांचा दौरा करीत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सध्या आभार दौरा सुरू आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री लवकरच नाशिकला येणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसह उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांची जोरदार तयारी शिवसेना शिंदे पक्षाकडून सुरू आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्री भुसे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, संपर्क नेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, आमदार सुहास कांदे, महानगर प्रमुख बंटी तिदमे, अनिल ढिकले यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com