BJP Politics: धक्कादायक, ५० लाखांची खंडणीआणि अपहरणासाठी भाजप नेत्याला अटक

BJP politics; BJP leader Rohil Kundalwal arrested, ransom of Rs 50 lakhs take -व्याजाने पैसे देणाऱ्या रोहित कुंडलवालने 50 लाखांच्या खंडणीसाठी केले अपहरण आणि अल्पवयीन मुलीचा विनयभंग.
BJP Leader Rohit Kundalwal
BJP Leader Rohit KundalwalSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News: नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि राजकारण यांचा कनिष्ठ संबंध जोडला जाऊ लागला आहे. त्यात आणखी एक कडी जोडली गेली आहे. भाजपच्या एका नेत्याने खंडणीसाठी अपहरण करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांची हिंमत वाढत असल्याचे चित्र आहे.

भाजपच्या कामगार आघाडीचा नेता रोहित कुंडलवाल आणि त्याचे वडील कैलास कुंडलवाल यांचा व्याजाने पैसे देण्याचा धंदा आहे. त्यासाठी ते भरमसाठ व्याज वसुली करतात. नागरिकांना व्याजाच्या पैशांसाठी धमकावणे आणि अपहरण हे त्यांचे नेहमीचे झाले आहे.

BJP Leader Rohit Kundalwal
Vote jihad Politics: आसिफ शेख यांचा धक्कादायक दावा, ‘होय, निवडणुकीसाठी मालेगावात बाहेरून पैसे आले’

यासंदर्भात नाशिक शहरातील एका कापड व्यापाऱ्याला पंधरा लाख रुपये व्याजाने दिले होते. त्या बदल्यात ३८ लाख वसूल करण्यात आले. आणखी ५० लाखाची मागणी केल्याने हा प्रकार घडला. संबंधितांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांना पिस्तूलने धमकाबत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

BJP Leader Rohit Kundalwal
Ajit Navale Politics:अजित नवलेंचा महायुतीला दणका, म्हणाले, अर्थसंकल्पात केवळ ठेकेदारी आणि टक्केवारीच!

रोहित कुंडलवाल आणि त्याच्या वडिलांनी तक्रारदारांच्या अल्पवयीन मुलींशी देखील गैरवर्तन करून विनयभंग केला. संबंधितांना ५० लाख रुपये न दिल्यास जीवे ठार मारण्याचे धमकी देत थेट त्यांचे अपहरण केले. याबाबत गेले काही दिवस सातत्याने संबंधित व्यापाऱ्याला भाजपनेता कुंडलवाल धमकावत होता.

या संदर्भात संबंधित व्यापाऱ्याने काल भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, धक्कादायक बाबी पुढे आल्या. संबंधित कुंडलवालकडे अनेक महागड्या गाड्या देखील आढळल्या आहेत. त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमध्ये ५० कर्जदारांची नावे आढळली आहेत. या कर्जदारांनाही याच पद्धतीने छळण्यात येत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

भाजप नेता कुंडलवाले यांनी शुक्रवारी सकाळी संबंधित व्यापाऱ्याला एका हॉटेलमध्ये बोलावले. त्यानंतर जबरदस्तीने आपल्या गाडीत (एम एच २० एफयू ६८००) गाडीत बसविले. दुपारी व्यापाऱ्याला पेठ नाका सिग्नल येथे बोलावून घेतले. तीथे त्यांना सिग्नलवर पिस्तुलचा धाक दाखवत ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी या व्यापाऱ्याने गयावया करून आपली सुटका करून घेतली.

त्यानंतर सायंकाळी पुन्हा खंडेलवाल त्यांच्या दुकानात गेला आणि ५० लाखाची अवाजवी मागणी करू लागला. त्यानंतर त्यांने पोलिसांकडे तक्रार केली. भाजप नेता कुंडलवाल याने व्यापाऱ्याच्या पंधरा वर्षे मुलीचा देखील विनयभंग केला. तिला विविध ठिकाणी स्पर्श करीत धमकावले. पोलिसांनी कुंडलवाल याला अटक केली आहे. त्याचे वडील कैलास हे फरारी आहेत.

त्याच्याकडे तीन मोबाईल, सोन्याची साखळी, पिस्तुल, सहा जिवंत काडतुसे आणि नोटा मोजण्याचे मशीन आढळले आहे. त्याच्याकडील डायरीत एका पानावर २६ आणि दुसऱ्या पानावर २९ अशा ५५ व्यक्तींची पैसे दिल्याबाबत नोंद आहे. रोहित कुंडलवाल हा भाजपचा कामगार आघाडीचा नेता आहे. त्याचे भाजप नेत्यांसमवेत अनेक फोटो देखील आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत त्याचे पोस्टर आढळले आहे. एका गंभीर गुन्ह्यात भाजप नेत्याला अटक झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com