BJP Municipal Chief Controversy: धक्कादायक! भाजप नगराध्यक्षाचे पद वाचविण्यासाठी अधिकारी चक्क आयसीयूत दाखल?

BJP Officer Health Drama For Post : साक्री नगरपालिकेच्या भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी 18 जूनला जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. त्याबाबत बुधवारी विशेष सभा होती.
Sakri BJP Municipal President admitted to hospital as no-confidence motion creates political stir
Sakri BJP Municipal President admitted to hospital as no-confidence motion creates political stirsarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena News: साक्री नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. या प्रकरणात चक्क प्रशासनच राजकीय पक्ष झाल्यासारखे वागल्याने तो चर्चा आणि संतापाचा विषय बनला आहे. यात सबंध प्रशासन राजकीय दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनीच केल्याने खळबळ उडाली आहे.

साक्री शहराच्या भाजपच्या नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या विरोधात 12 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यासाठी चक्क भाजप नेत्यांनीच पुढाकार घेतला होता. मात्र भाजपनेच आणलेल्या या प्रस्तावा विरोधात सबंध प्रशासन दिवसभर कार्यरत होते. त्यामुळे अविश्वास प्रस्तावाची सभाच होऊ शकली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

साक्री नगरपालिकेच्या भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी 18 जूनला जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. त्याबाबत बुधवारी विशेष सभा होती. मात्र सभेला निघालेले उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर हे रस्त्यातूनच परत जात चक्क रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे सभा होऊ शकली नाही.

प्रशासनाने भाजप नगराध्यक्षांना केलेली ही उघड उघड मदत होती, असा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदार मंजुळा गावित यांनी केला. त्या विरोधात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच समर्थकांचा धरणे आंदोलन सुरू केले.

Sakri BJP Municipal President admitted to hospital as no-confidence motion creates political stir
Vinay Sahasrabuddhe -देशात अघोषित आणीबाणी लादल्याच्या काँग्रेसच्या आरोपावर भाजपचंही चोख प्रत्युत्तर!

यामध्ये नगरपालिकेच्या सभागृहात मात्र हाय व्होल्टेज ड्रामा घडला. भाजप नेत्यांचं विरोधातील सर्व 12 नगरसेवक सभागृहातच बसून राहिले. सायंकाळी चार ला त्यांनी प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन सुरू केले. त्यांना पाठिंबा म्हणून साखरी शहर बंद करण्यात आले. त्यानंतर नगरसेवकांसह नागरिकांनी महामार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे शहरभर तणाव निर्माण झाला.

कार्यकर्ते आक्रमक

शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ तुळशीराम गावित, भाजप नेते सुरेश पाटील चंद्रकांत पाटील, ज्ञानेश्वर नागरे, संजय मराठे, उपनगराध्यक्ष बापूसाहेब शिंदे, माजी नगराध्यक्ष अरविंद भोसले, माजी नगरसेवक राजेंद्र पाटील, अशोक गिरी, भाजप (BJP) नेते संजय अहिरराव या नगरसेवकांनी व नेत्यांनी घटनेचा तीव्र निषेध केला. मोर्चा काढून महामार्गावर रास्ता रोको केला. तणाव प्रचंड वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे पोलिसबळासह दाखल झाले. मात्र नगरसेवक आणि कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

आता चार जुलैला होणार सभा

आमदार गावित यांनी वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून याबाबत तक्रार केली. त्यानंतर प्रशासनही हादरले. शेवटी तहकूब सभा येत्या चार जुलैला घेण्याचे ठरले. या सभेत अविश्वास प्रस्ताबाबत चर्चा होऊन निर्णय होईल. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्ष विरोधात त्यांच्याच पक्षातील नगरसेवक विरोधात गेल्याचे चित्र साखळी शहरात पाहायला मिळाले.

मात्र अल्पमतातील नगराध्यक्ष जयश्री पवार यांचे पद वाचविण्यासाठी राजकीय अदृश्य शक्ती धावून आल्या. प्रशासन त्यांच्या मदतीसाठी झटले. सत्तेचा मोठा दुरुपयोग या प्रकरणात झाल्याने त्याची चौकशी व्हावी अशी मागणी चक्क सत्ताधारी नगरसेवकांनीच केल्याने खळबळ उडाली आहे.

Sakri BJP Municipal President admitted to hospital as no-confidence motion creates political stir
Vaibhav Sable : अखेर 'तो' लाचखोर उपायुक्त निलंबित! सात लाखांची लाच घेताना सापडला होता रंगेहाथ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com