
Sangli News : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका उपायुक्त वैभव विजय साबळे यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती. 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी त्यांनी लाचेची मागणी करताना सात लाख रुपये लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. ज्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. पण त्यांच्यावर पंधरवड्यानंतरही कोणतीच प्रशासकीय कारवाई झाली नव्हती. त्यामुळे साबळे यांच्यावर कारवाई कधी होणार अशी विचारणा जिल्ह्यातून होत होती. अखेर पंधरवड्यानंतर साबळे याला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश नगरविकास विभागाने पालिका प्रशासनाला दिले आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातील एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांनी 15 लाखांच्या लाचेची मागणी केली होती. पण तडजोडीअंती सात लाख रुपयांवर ही डिल फिक्स झाली होती. त्यानंतर या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणीनंतर सोमवारी (ता.9 जून) लाचलुचपत विभागाने कारवाई करत त्यांना अटक केली होती. ही कारवाई उपअधीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली होती. तर साबळेंविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या कारवाईनंतर काही बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या आवारात फटाके फोडून आनंद साजरा केला होता. तसेच इस्लामपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथेही फटाके फोडून आनंद साजरा केला होता. तसेच त्यांच्या शासकीय सेवेतील चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती.
मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर साबळे यांच्यावर प्रशासकीय पातळीवर कारवाई झाली नव्हती. ज्यामुळे जिल्ह्यातील नाराजी व्यक्त केली जात होती. यानंतर आता तब्बल पंधरवड्यानंतर अखेर वैभव साबळे याला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. नगरविकास विभागाने तसे आदेश काढल्याने 9 जूनपासूनच त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
साबळे याच्यावर गुन्हा दाखल होताच पालिका प्रशासनाने कारवाईबाबतचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला होता. नगरविकासच्या सचिवांनी आज याबाबतचे आदेश मंगळवारी जारी केले. जे महापालिका प्रशासनास मिळाले आहेत.
दरम्यान, साबळे याच्याविरोधात तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता यांचेही नाव समोर आले होते. त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीअंती कारवाईतून त्यांना वगळले आहे. मात्र तक्रारदार तानाजी रुईकर यांनी साबळेसोबत त्यांनाही सहआरोपी करावे, यासाठी आग्रह धरला असून त्यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.