Jalgaon Politics: शिवसेना शिंदेच्या आमदारांनी केली भाजपची बोलती बंद, कर्जमाफीच्या प्रश्नावर बच्चू कडूंवर उधळली स्तुती सुमने, किशोर पाटील यांच्या वक्तव्याने भाजप घायाळ!

BJP Shiv Sena Eknath Shinde Party War on Municipal Elections Kishore Patil Episode on Loan Waiver Issue-संकट मोचक गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना शिवसेना शिंदे पक्षाच्या विरोधात मैदानात उतरवले आहे.
Kishor Patil
Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena Shinde News: भाजपच्या इनकमिंग मुळे महायुतीत खटके उडू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात तर भाजपला विरोधकांची गरजच राहिली नाही. शिवसेना शिंदे पक्षाच्या बाणांनीच भाजप पुरता घायाळ होत आहे.

जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व भाजप जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आहे. मंत्री महाजन यांनी जळगाव जिल्ह्यावर लक्ष ठेवून नाशिकची जबाबदारी घेतली आहे. शिवसेना शिंदे पक्षाची आघाडी सांभाळण्यासाठी त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना मैदानात उतरवले आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपला चांगले शिंगावर घेतले आहे. रोज आमदार पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्या आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामध्ये आमदार किशोर पाटील यांनी आता राज्य सरकारच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Kishor Patil
Parth Pawar Controversy: प्रकरण अजित पवारांचे, खडसेंना फडणवीसांविरुद्ध मिळाले मोठे शस्त्र, म्हणाले, ‘फडणवीस अजित पवारांना वाचवणारच’

जळगावचा केळी उत्पादक आणि अन्य शेतकरी निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडला आहे. त्याला शासनाचा आधार हवा आहे. मात्र राज्य सरकार त्याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही, या शेलक्या शब्दात आमदार पाटील यांनी महायुती सरकारला घेरले.

Kishor Patil
Parth Pawar Controversy: प्रकरण अजित पवारांचे, खडसेंना फडणवीसांविरुद्ध मिळाले मोठे शस्त्र, म्हणाले, ‘फडणवीस अजित पवारांना वाचवणारच’

एवढ्यावरच न थांबता शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार पाटील यांनी कर्जमाफीच्या मागणीचे समर्थन केले. केळी उत्पादक संकटात आहे. अन्य शेतकरी धाय मोकलून रडत आहेत. त्यांना आज मदतीची गरज आहे. मात्र हे सरकार कोणालाही मदत देण्यास पुढे येत नाही.

यावेळी आमदार बच्चू कडू यांच्या मागणीलाही त्यांनी पाठिंबा दिला. बच्चू कडू कोणत्या पक्षाचे आहेत हे मला माहीत नाही. प्रहार संघटनेने शेतकरी कर्जमुक्ती साठी केलेले आंदोलन अतिशय योग्य आहे, असे सांगितले. त्यामुळे विरोधही करता येत नाही अन् समर्थनही करता येत नाही, अशा कोंडीत भाजप नेते सापडले.

राज्य सरकारने कर्जमुक्तीच्या मागणीला तातडीने प्रतिसाद देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ३० जून ची वाट पाहू नये. शेतकऱ्यांना आजच मदतीची आवश्यकता आहे. तातडीने कर्जमुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, असे आमदार पाटील म्हणाले.

आमदार किशोर पाटील यांच्या या भूमिकेने भाजप चांगलाच घायाळ झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि कर्जमुक्ती या संवेदनशील विषयावर आमदार पाटील यांनी भाजपची अडचण केली. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी वैयक्तिक स्तरावरील आमदार पाटील यांचा समाचार घेतला.

या निमित्ताने नगरपालिका निवडणूक अधिक गंभीर वळणावर पोहोचली आहे. आमदार किशोर पाटील विरुद्ध भाजप आणि अन्य सगळे असे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांच्या विरोधात काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. त्यामुळे जळगावचे राजकारण अधिक रंगतदार बनले आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com