NCP Jalgaon : भाजप-शिवसेनेकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसला सावत्र वागणूक, जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची घूसमट बाहेर

Jalgaon Mahayuti Politics : शिवसेना आणि भाजपकडून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सावत्र वागणूक मिळत असल्याची नाराजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केली. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे दिसत आहे.
Sunetra Pawar, Devendra Fadnavis
Sunetra Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : निवडणुका आल्या की, 'महायुती'चा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतले जाते. मात्र, इतर वेळी पक्षाला सातत्याने डावलले जात असल्याची तीव्र नाराजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा जिल्हा आढावा बैठकीत व्यक्त करण्यात आली.

शिवसेना आणि भाजपकडून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा सूरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावला. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्ह्याची मासिक आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. जिल्हाध्यक्ष तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यात अमळनेर मतदारसंघातून माजी मंत्री अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.

त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक आमदारांकडून शासकीय कार्यक्रम, बैठका तसेच महायुती सरकारच्या निधीतून मंजूर विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जात नसल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारचा समन्वय साधला जात नाही. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. महायुतीमध्ये असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसला सावत्र वागणूक मिळत असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. महायुतीमधील घटक पक्ष म्हणून स्थानिक पातळीवर योग्य तो सन्मान मिळायला हवा, अशी मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

Sunetra Pawar, Devendra Fadnavis
Nashik Kumbh Mela 2027 : नाशिकमधील खर्चाने देशातील 6 कुंभमेळ्यांचा विक्रम मोडला... प्रयागराजपेक्षा पाचपट पैसा खर्च होणार!

बैठकीत व्यक्त झालेल्या तीव्र भावना लक्षात घेऊन भाजप आणि शिवसेनेने महायुती धर्म पाळून राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वयाची भूमिका ठेवावी, यासाठी रावेर लोकसभा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली जाणार आहे.

यावेळी सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, भगतसिंग पाटील यांनी मार्गदर्शन केले. रावेरचे उपनगराध्यक्ष असिफ दारा शेख, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ. सोपान दुट्टे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष कुर्बान शेख, चोपडा सूतगिरणीचे संचालक शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे अक्षय सोनवणे, युवती जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Sunetra Pawar, Devendra Fadnavis
Prithviraj Chavan : 'कुंभमेळ्याचा पैसा मुख्यमंत्र्यांच्या घरचा नाही'; चव्हाणांचा फडणवीसांना चिमटा, तोही नाशिकमध्ये येऊन

या बैठकीला भुसावळ शहराध्यक्ष नगरसेवक संतोष (दाढी) चौधरी, माजी उपनगराध्यक्ष आशिकखान शेरखान, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ, यावलचे माजी उपनगराध्यक्ष मुस्तफा शेख, भुसावळ तालुकाध्यक्ष विलास पाटील, रावेरचे योगेश पाटील, बोदवडचे निवृत्ती ढोले, मुक्ताईनगरचे गोपाळ पाटील, यावलचे कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, नगरसेवक कदीर खान, नीलेश कोलते, मुक्ताईनगरचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ बागवान आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com