नाशिक : महापालिकेत भाजप सत्तेत तर शिवसेना विरोधी बाकावर आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शविशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी लोकार्पण केलेल्या स्मारकाचा दोघांनाही विसर पडला. भाजप उदासीन, शिवसेनेला विसर अशी स्थिती झाल्याने `मनसे` कडून या स्मारकाची साफसफाई करण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या शिवकालीन शस्त्रांचे राज्यातील एकमेव संग्रहालय हे नाशिकमध्ये उभारण्यात आले आहे.मात्र या शस्त्र संग्रहालयाची दयनीय अवस्था झाली आहे,आज मनसेच्या वतीने या शस्त्र संग्रहालयाची साफसफाई करण्यात आली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे संग्रहालय नाशिकच्या गंगापूररोड परिसरात उभारण्यात आले आहे. स्वतः स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते शिवकालीन शस्त्र संग्रहालयाचे उदघाटन करण्यात आले होते. या ठिकाणी अनेक शिवकालीन शस्त्र ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अमूल्य ठेवा पाहता यावा यासाठी हे शस्त्र संग्रहालय उभारण्यात आले होते. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने सध्या त्याची स्थिती दयनीय आहे. ते बंद अवस्थेत पडले आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांनी हाती झाडू घेऊन संग्रहालयाची साफसफाई केली. या संग्रहालयाची अवस्था दयनीय झाली आहे की, वीजेचे देयक थकल्याने येथील वीज कनेक्शन देखील बंद करण्यात आले आहे. महापालिकेने ते अदा करणे अपेक्षीत आहे. मात्र ते न भरल्याने संग्रहालय अंधारात आहे. मनसेकडून त्याची उभारणी झाल्याने सत्ताधारी भाजपने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अशा स्थितीत राजकरण बाजूला ठेऊन या अमूल्य ठेव्याचे जतन केले तर नक्कीच शहरवासीयांना शिवकालीन सृष्टीची माहिती मिळेल. शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम, त्याचे विचार, हे प्रत्येक पिढीच्या मनामनात पोहचवण्यासाठी मदत होईल, हे मात्र नक्की.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.