Vivek Kolhe MLC election : एक तपानंतर ‘कमबॅक’! विधान परिषद ‘फिक्स’! विवेक कोल्हेंचा गुलालात जल्लोष; राज्यात मोठ्या भूमिकेचे संकेत

After being elected unopposed to the Legislative Council, BJP leader Vivek Kolhe receives a grand welcome in Kopargaon and Hint broader political role in Maharashtra : विधान परिषदेवर संधी आणि बिनविरोध निवडीनंतर विवेक कोल्हे कोपरगावमध्ये येताच, कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं.
Vivek Kolhe MLC election
Vivek Kolhe MLC electionSarkarnama
Published on
Updated on

Kopargaon BJP celebration : राज्य विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध ठरली आहे. या नऊ उमेदवारांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता आता चार मे रोजी पार पडणार आहे. बिनविरोधामुळे निश्चिंत झालेले उमेदवार आपापल्या मतदारसंघात परतले आहे.

भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे काल उशिरा कोपरगावात दाखल होता, कार्यकर्त्यांनी त्यांची विजयी मिरवणूक काढली. या वेळी विवेक कोल्हे यांनी, राज्य पातळीवर काम करण्याचे सूचक संकेत दिले. त्यामुळे विवेक कोल्हे यांच्या या प्रतिक्रियेमुळे विरोधकांसह स्थानिक सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

विवेक कोल्हे म्हणाले, "कोपरगावसह (Kopargaon), पक्षाच्या इतर काही, तालुके, शहर, संपूर्ण महाराष्ट्रातील युवा पिढीचे सहकारातील, कृषीचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची अपेक्षा आहे. त्यावर निश्चितपणे काम करत राहील."

बारा वर्षापूर्वी स्नेहलता कोल्हे विधानसभा निवडणूक जिंकल्या होत्या, त्यावेळी गुलाल अंगावर घेतला होता. त्यानंतर आज विधान परिषदेच्या निमित्ताने पुन्हा विजयाचा गुलाल अंगावर घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा उत्साह आहे, असेही विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी म्हटलं.

Vivek Kolhe MLC election
Vivek Kolhe MLC candidature : बावनकुळेंचा कोल्हेंसाठी विधान परिषदेचा पुनरूच्चार; अमितभाई अन् कार्यकर्त्यांच्या मनातलं ओळखलेलं अजितदादांचं 'ते' विधान!

या विजयाच्या गुलालाबरोबर कार्यकर्त्यांचा देखील वनवास संपला आहे. मतदारसंघात सर्वाधिक लोकनियुक्त सरपंच हे भाजप विचारांचे आहेत. त्यांना अधिकची ताकद मिळत नव्हती. विधान परिषदेच्या निमित्ताने देवाभाऊंनी जो समतोल इथं साधला आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.

Vivek Kolhe MLC election
Vivek Kolhe MLC : 'पक्षाचा शब्द अंतिम!' विवेक कोल्हेंचा मार्ग मोकळा? बावनकुळेंनी पत्ते उघडले!

कोपरगावात विधानसभेचे आमदार आशुतोष काळे हे आहेत. मग एका म्यानात दोन तलावारी कशा राहणार? यावर बोलताना विवेक कोल्हे यांनी मिश्किलपण समतोल साधणारी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'सगळं काही होईल. सकारात्मक विचार करू या. कोपरगावला यामुळे फायदाच होणार आहे.'

कोपरगावकरांमुळे संधी मिळाली आहे. कोपरगावसह महाराष्ट्रातील सहकारातील युवकांचे, शेतकऱ्यांचे, कृषीचे प्रश्न मोठे आहेत, ते सोडवण्यासाठी काम करत राहणार, असे सांगत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार असल्याचे संकेत विवेक कोल्हे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com