Nashik Loksabha Constituency : तीर्थक्षेत्रांवर भाजपाची नजर, तर नाशिकला दूर कसे ठेवणार?

BJP News : भाजपाच्या सर्व्हेमध्ये हेमंत गोडसेंबाबत नाराजी असल्याचे समोर आले आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Loksabha News : राज्यातील नव्हे तर देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणांकडे भाजपाने मागील दहा ते बारा वर्षांपासून मोर्चा वळवला. काशीतून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेसाठी उभे राहिले होते. साधु महंतला जोडण्यासह हिंदुत्वाचा नारा आणखी बुलंद करण्यासाठी तीर्थक्षेत्र महत्वाचे ठिकाण आहे.

महापालिकेतील एकहाती सत्ता आणि त्याचबरोबर शहरातील तीन विधानसभा मतदार संघावर भाजपाने विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. आता वेळ लोकसभेची असून, यात तीर्थक्षेत्राच्या विकासाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे तुर्तास नाशिक लोकसभा मतदार संघ भाजपा दूर करणार नाही, अशी चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP
Hingoli Loksabha Constituency : हिंगोली मतदारसंघासाठी अशोक चव्हाण आग्रही; ठाकरे गट माघार घेणार...?

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये तसेच महाआघाडीतही अद्याप वरिष्ठ पातळीवरील बोलणी सुरू असली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते दावे अन प्रतिदावे करत आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) युवा सेनेचा मेळावा नुकताच नाशिकमध्ये पार पडला. त्यात नाशिक लोकसभेसाठी तयारीला लागा असा संदेश नेत्यांकडून देण्यात आला.

यामुळे तिसऱ्या टर्मसाठी तयारी करणाऱ्या खासदार हेमंत गोडसे(Hemant Godse) यांच्या आंनदाला पारावार उरला नाही. आजमितीस शिंदे गटाकडे सध्या गोडसे यांच्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. तर गोडसेंच्या नावाला भाजपाकडूनच विरोध होतो आहे. भाजपाच्या सर्व्हेमध्ये गोडसेंबाबत नाराजी असल्याची ओरड भाजपाकडून सुरू आहे.

सूत्रांच्या दाव्यानुसार, तीर्थक्षेत्राचा विकास म्हणून भाजपाकडून नाशिक लोकसभेवर भाजपा दावा सांगू शकते. यासाठी जोरदार तयारी सुरू असून, भाजपा यातून माघार घेईल, अशी शक्यता कमी आहे. भाजपाकडून सुरूवातीस लक्ष्मण सावजी यांचे नाव पुढे आले होते. मात्र, हळुहळु ते मागे पडले. त्यानंतर नाशिक(Nashik) पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल ढिकले यांचे नाव पुढे आले. मराठा समाज विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांचेही नाव चर्चेत आले तरी अद्याप त्यांनी आपले मनसुब्बे प्रगट केलेले नाहीत.

BJP
Bjp News : आमदार सीमा हिरेंचं टेन्शन वाढणार; सोनालीराजेही खोचणार पदर

भाजपाचे(BJP) माजी नगरसेवक दिनकर पाटील आपल्यापरीने ताकद लावत असून, यामागे त्यांना पक्षाची फूस आहे की नेहमीप्रमाणे पाटील स्वत: पुढाकार घेत आहेत, हे लवकरच समोर येईल. आगामी काळात विधानसभा, महापालिका आणि त्यानंतर लागलीच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. यात वरचष्मा ठेवण्याची एकही संधी भाजपा सोडणार नाही. याची सुरूवात नाशिक लोकसभा मतदार संघावर वर्चस्व निर्माण करूनच होऊ शकते.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com