भाजपचे १८ जण शिवसेना प्रवेशास उत्सुक; नगरसेवक संगमनेरे राऊतांच्या स्वागताला

शिवसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख- बुथप्रमुख संवादाचा कार्यक्रम रविवारी झाला.
BJP corporator touching feet of Shivsena Leader Sanjay Raut.
BJP corporator touching feet of Shivsena Leader Sanjay Raut.Sarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुंबई ठाण्याप्रमाणे नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आजही आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेची सत्ता शिवसेना घेणारच पण नाशिक शहरात शिवसेनेचा एकही आमदार नाही, याची खंत प्रत्येक शिवसैनिकांनी ठेवली पाहिजे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी केले.

शिवसेनेच्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख- बुथप्रमुख संवादाचा कार्यक्रम रविवारी झाला. यावेळी भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे (BJP corporator Vishal Sangamnere) यांनी व्यासपीठावर जाऊन श्री राऊत यांचे स्वागत केले. त्यांचे आर्शिवाद घेतले. त्यामुळे खळबळ उडाली.

BJP corporator touching feet of Shivsena Leader Sanjay Raut.
`प्राप्तिकर` छाप्यात कांदा व्यापाऱ्यांकडे २५ कोटींची रोकड, १२५ कोटींची मालमत्ता!

यावेळी खासदार राऊत म्हणाले की, १०० कोटी लस टोचल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा आहे, फक्त २३ कोटी लस टोचल्या आहेत. मात्र केंद्र सरकार आकडा फुगवून सांगते आहे, असा आरोप त्यांनी केला. अंमली पदार्थांच्या निमित्ताने महाराष्ट्र बदनाम केला जात आहे. शिवसेनेच्या पक्ष विस्ताराचे काम सुरु असून प्रत्येक कार्यक्रमात महिलांची संख्या जास्त आहे, यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता लक्षात येते. भाजपच्या १७ ते १८ जणांनी विचारणा केली. यापुढे महाराष्ट्रात राजकीय क्षितिजावर शिवसेनेचा सूर्य तळपत राहील. २८ तारखेला या सरकारला २ वर्ष होतील. आणखी ३ वर्षपण जातील आणि पुढील पाच वर्षे पण आमचेच असतील, हिम्मत असेल तर हटवून दाखवा, असे आव्हान दिले.

BJP corporator touching feet of Shivsena Leader Sanjay Raut.
ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबी नंतर सरकार पाडायला आर्मी बोलावणार का?

खासदार राऊत म्हणाले की आम्ही कोणत्याही आघाडीत असू आम्ही हिंदुत्वाचा विचार सोडणार नाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकला जे पेरले तेच उगवले नाशिक शिवसेनेची प्रयोगशाळा आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेत साडेसातशे कोटींचा गैरव्यवहार आहे. नाशिक महापालिकेतील स्मार्ट सिटीतील घोटाळे बाहेर काढा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, आमदार नरेंद्र दराडे, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, योगेश घोलप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com