नाशिक : प्राप्तिकर विभागाच्या पथकाने पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यात सुमारे २५ कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान, तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईत तब्बल १२५ कोटींच्या अघोषित मालमत्ता शोधण्यात प्राप्तिकर खात्याच्या अन्वेषण विभागातील (Income Tax Departments investgation team) पथकाला यश आले आहे.
पिंपळगाव बसवंत येथील काही कांदा व्यापाऱ्यांसह बारा ते पंधरा जणांच्या मलमत्तांची प्राप्तिकर अन्वेषण विभागाने तपासणी केली. शनिवारी दिवसभर स्टेट बँकेत नोटांची मोजणी सुरू होती. रात्री उशिरापर्यंत २५ कोटींच्या आसपास जप्त केलेली रोकड हस्तगत करण्यात यश आले. रविवारी सकाळपर्यंत मोजणी सुरू राहील, असा अंदाज प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.
निफाड तालुक्यात कांद्याचे मोठे क्षेत्र नसताना पिंपळगाव बसवंत व लासलगाव या बाजारपेठा आशिया खंडात कांद्याची राजधानी म्हणून ओळखल्या जातात. संचालक मंडळाचे धोरण व शेतकऱ्यांचा विश्वास यामुळे हा नावलौकीक मिळाला. यासह सिंहाचा वाटा राहीला तो व्यापारी वर्गाचा. जिल्ह्यातील इतर बाजार समितीच्या तुलनेत कांद्याला उच्चांकी दर दिल्याने शेतकरी तीन-चार बाजार समिती ओलांडून पिंपळगाव बसवंत, लासलगावला पसंती देतात. असे असताना आयकर विभागाच्या छाप्यामुळे कांदा दर घसरून शेतकऱ्यांचेच नुकसान होते. कांद्याचे दर तेजीत असतानाच हे धाडसत्र होत असते, असा इतिहास आहे. कांद्याचे दर पाडण्याचा तर हा उद्योग नाही ना, अशी शेतकऱ्यांना शंका उपस्थित होत आहे.
पिंपळगावातील सहा व्यापाऱ्यावर आयकर विभागाने छापे टाकले. कांदा पाच हजार रूपये प्रतिक्विंटलकडे झेप घेत असतानाच हे छापे पडल्याने त्याचा परिणाम दर घसरणीत झाला. दरवाढीला मोठा ब्रेक लागल्याने शेतकरी नाराज झाला आहे. आयकर विभागाचे छापे यापूर्वीही शहरातील काही कांदा व्यापाऱ्यांकडे झाले. पण निष्पण्ण काय झाले हा कळीचा मुद्दा आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालयावर तपासणी सुरूच होती. आयकर भरण्यात व्यापारी लपाछपी करीत असतील तर कारवाई जरूर व्हावी. पण उगाच वेठीस धरून कांद्याचे दर पाडत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचा एक रूपयाही बाकी ठेवलेला नसताना ही कारवाई म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्याच्या दोन पैशावरही डोळा असाच अर्थ काढला जात आहे.
...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.