ईडी, सीबीआय, आयटी, एनसीबी नंतर सरकार पाडायला आर्मी बोलावणार का?

नाशिक दौऱ्यावर असलेले खासदार राऊत यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला.
Shivsena leader Sanjay Raut
Shivsena leader Sanjay RautSarkarnama

नाशिक : भारतीय जनता पक्ष राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी केंद्रातील सत्तेचा प्रचंड गैरवापर करीत आहे. त्यांनी ईडी, सीबीआय, प्राप्तिकर आणि अगदी एसीबीचा देखील वापर केला आहे. तरी राज्यातील सरकार पडत नाही. तेव्हा आता काय आर्मी बोलावणार की काय? असा प्रश्न शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Shivsena Leader Sanjay Raut) यांनी केला.

Shivsena leader Sanjay Raut
रोहित पवारांसमोरच राष्ट्रवादीचे दोन गट भिडले; पवार तिसऱ्या गटासोबत गेले!

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भक्कम आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रयोगाची मात्रा लागू पडणार नाही. ते पाच वर्षे टिकेलच, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार उत्तमरीत्या कामकाज करीत आहे. राजकीय आकसापोटी व राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी ईडी, सीबीआय, आयटी आणि एनसीबीमार्फत कारवाया केल्या गेल्या आहेत. मात्र त्याचा परिणाम होणार नाही. हे सर्व केल्यावर देखील सरकार पडत नाही, मग आता ते आर्मी बोलवणार का?. महाराष्ट्र तुळशी वृंदावन आहे. येथे गांजा पिकूच शकत नाही, असा टोमणा देखील खासदार राऊत यांनी मारला.

Shivsena leader Sanjay Raut
`प्राप्तिकर` छाप्यात कांदा व्यापाऱ्यांकडे २५ कोटींची रोकड, १२५ कोटींची मालमत्ता!

नाशिक दौऱ्यावर असलेले खासदार राऊत म्हणाले, की सध्याचे महाविकास आघाडीचे सरकार ‘पुलोद’ सरकारची रिप्लिका आहे. पुलोदचे तत्कालीन ज्येष्ठ नेते शरद पवार हेच सरकारचे मार्गदर्शक आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकेल. कितीही घेराबंदी केली, तरी काही फरक पडत नाही.

यावेळी राऊत यांनी भाजपवर चांगलेच कोरडे ओढले. ते म्हणाले, सरकारविरोधात काव काव करणाऱ्या कावळ्यांची पिसे आणि चोचा झडतील; पण सरकार कायम राहील. भाजपचे डोमकावळे कितीही फडफडले, तरी सरकार पाडण्याची सुपारी ते फोडू शकत नाहीत. सुपाऱ्या आम्हीच फोडत राहू, असा दावा त्यांनी केला. एनसीबी कारवाई प्रकरणी ते म्हणाले, की मंत्री नवाब मलिक एक जबाबदार पक्षाचे नेते आहेत. त्यांच्याविषयी मतभेद असू शकतात, पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तरं तर द्यावीच लागतील. यात समीर मराठे हे मराठी अधिकारी असल्याविषयी विचारले असता त्यांनी, यात आधिकारी मराठी-अमराठी हा विषय येत नाही. हा न्यायालयीन विषय आहे.

ते म्हणाले, हिंदुत्वाबाबत आम्हाला कोणीही सांगू नये. आम्ही हिंदुत्वाचे पुराणपुरुष आहोत. बाबरी मशिद पाडली, त्या वेळी उघडपणे समर्थन केले. पळून गेलो नाही, असा दावा करीत बांगलादेश आणि जम्मू काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या होत आहेत. १७ दिवसांत २१ हिंदू आणि शीखांच्या हत्या झाल्या. १९ जवान शहीद झाले. अशा परिस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला अनंतनाग, बारामुल्ला येथेच थांबले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. शिवसेनेत राहिलो असतो, तर मुख्यमंत्री झालो असतो या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याविषयी राऊत म्हणाले, की भुजबळांबरोबरच बोलत आहे. राज्यात असे अनेक दुर्दैवी आहेत, ज्यांनी शिवसेना सोडली. त्यांच्या नशिबी काय आले हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे निश्‍चितच भुजबळ शिवसेनेत असते, तर यापेक्षा मोठे झाले असते.

यावेळी संर्पकप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, गटनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com