Ahmednagar News : नगर दक्षिणच्या विजयानंतर पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्या कट्टर समर्थक राहुल झावरेंनी केलेल्या प्रकारावर भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कडक प्रहार केला. 'शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह नीलेश लंके यांना विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला', अशी बोचरी टिप्पणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पारनेरमधील प्रकारावर ट्विट केले आहे. आम्हीला निवडणुकीत आलेला पराभव आम्ही स्वीकारला आहे. मात्र शरद पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचा विजय साजरा करण्याचा राक्षसी पॅटर्न दाखवून दिला. पारनेरचे नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झावरे यांनी राक्षसीपण आपला विजय साजरा करण्यास सुरूवात केली. लंके समर्थकांनी 10-15 कार्यकर्त्यांना घेऊन महायुतीचे भाजप (BJP) उमेदवार सुजय विखे यांचा प्रचार करणाऱ्यांवरती हल्ला सुरू केला आहे.
सत्ता डोक्यात गेली आहे. उन्मत्त सुरू झाला आहे. राहुल झावरेने घरात घुसून गर्भवती महिलेवर हल्ला केला. याशिवाय तिथे ज्येष्ठ महिलेला देखील शिवीगाळ केली. या नराधमाला कायदा तर, शिक्षा देईल. मात्र नवनिर्वाचित खासदार लंके आणि त्यांची नेता मोठ्या ताई या हरामखोर झावरेला शिक्षा देणार का पाठिशी घालणार हे पहावं लागेल, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यश आल्यावर ते पचवता आलं पाहिजे. मिरवता देखील आले पाहिजे. पण महाविकास आघाडीच्या डोक्यात सत्ता जाऊ लागली. पण त्यांचा माज जय शिवरायांच्या पावनभूमीत सहन केला जाणार नाही. झावरेसारख्या औरंग्याच्या औलादिंना या जिजाऊच्या लेकीच धडा शिकवतील, असा देखील चित्रा वाघ यांनी नीलेश लंके आणि सुप्रिया सुळे यांना दिला आहे.
विखे आणि लंके समर्थकांमध्ये पारनेर बसस्थानकावर राडा झाला होता. राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे बातम्या पुढे आल्या. पण त्यामागील पार्श्वभूमी हळूहळू पुढे येऊ लागली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि पदाधिकारी यांनी काल सुपा (ता. पारनेर) येथे पत्रकार परिषद घेऊन ज्या महिलेवर घरात घुसून हल्ला झाला, तिला पुढे आणले.
या महिलेने झालेला प्रकार कथन केला आहे. यातून या घटनेतील आणखी एक बाजू पुढे आली. या महिलेने पत्रकार परिषद राहुल झावरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे झावरेंकडे जरी बोट असले तरी, झावरे हे लंकेंचे निकटवर्तीय असल्याने लंकेंकडे बोट होऊ लागले आहे. चित्रा वाघ यांनी या ट्विटनिमित्ताने टायमिंग साधले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.