BJP News : भाजपच्या आमदार आहेर, ढिकलेंनी पालकमंत्र्यांनाही मागे टाकले!

BJP`s Dr. Rahul Aher & Rahul Dhikle got maximum funds-भाजपच्या या आमदारांच्या मतदारसंघातील कामांसाठी प्रत्येकी ९० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
Dr. Rahul Aher & Rahul Dhikle
Dr. Rahul Aher & Rahul DhikleSarkarnama
Published on
Updated on

Nashik BJP News : पुरवणी अर्थसंकल्पात भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि राहुल ढिकले यांच्या मतदारसंघात जवळपास प्रत्येकी अंदाजे ९० कोटी निधी मिळाल्याचे विधिमंडळाने प्रकाशीत केलेल्या पुस्तिकेवरून दिसते. त्यामुळे या आमदारांनी पुरवणी अर्थसंकल्पातील कामांच्या मान्यतेत पालकमंत्र्यांनाही मागे टाकले आहे. (35 cr. funds sanctions for guardian minister Dada Bhuse`s Constituency)

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जात विकासासाठी सरकारला पाठींबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्ह्यात (Nashik) सहा आमदार असून त्यांनाही चांगला निधी मिळाला आहे. मात्र भाजपच्या (BJP) आमदारांनी सर्वांना मागे टाकले.

Dr. Rahul Aher & Rahul Dhikle
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आणि आदित्यंचा टोला | Aditya Thackeray On DCM | #shorts

सध्या राज्य सरकारमध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे दादा भुसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ हे दोघे कॅबिनेट मंत्री असूनही त्यांना त्यांना अनुक्रमे ३५ व ३६ कोटी रुपये निधी मिळाला आहे. शिवसेनेचेच आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या मागणीनुसार पुरवणी मागण्यांमधून नांदगावला ४० कोटींची कामे मंजूर झाली आहेत.

विधिमंडळाने पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर केलेल्या आदिवासी उपयोजनेच्या निधीतून नाशिक जिल्ह्यातील ४४८ कामे मंजूर झालेली असल्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांना चांगला निधी मिळाला आहे.

Dr. Rahul Aher & Rahul Dhikle
Pune News : इर्शाळवाडीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले; करुन दिली भोर, वेल्हे, मुळशीची आठवण...

पुरवणी मागण्यांमधून मंजूर झालेल्या निधीतून नाशिक शहरात रस्त्याच्या सहापदरीकरण व काँक्रिटीकरणासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे कर्मचारी निवासस्थान, इमारत, संरक्षक भिंत यासाठी ३६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. निफाड येथील ग्रामीण रुग्णालय ५० खाटांवरून १०० खाटांचे करण्यासाठी ३८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. तसेच घोटी ग्रामीण रुग्णालयासाठी आठ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

Dr. Rahul Aher & Rahul Dhikle
Nashik Kazigadhi News: शहरात आहे एक `इर्षाळवाडी`, इथले लोक रात्री झोपत नाही!

राष्ट्रवादी कॉग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर थोड्याच दिवसांत विधिमंडळ सुरू झाले. तोपर्यंत पुरवणी मागण्यांच्या याद्यांचे काम अतिम टप्प्यात होते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सूचवलेली कामे मंत्रालयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. यामुळे नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भाजप आमदारांच्या तुलनेत कमी निधी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com