Nashik After Irshalwadi Incident: रायगड येथील इर्षाळवाडीच्या दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. शहरातील काझीगढी ही देखील अनेक वर्षांपासून येथील नागरीक जीव मुठीत घेऊन राहतात, येथे रात्री लोकांना झोप येत नाही. इर्षाळवाडीच्या दुर्घटनेनंतर प्रशासनाने येथे पाहणी केली, मात्र दिलासा अद्यापही मिळालेला नाही. (Guardian Minister given instruction after the irshalwadi incident)
पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी प्रशासनाला सजग राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानंतर महापालिकेच्या (NMC) प्रशासनाने काल येथे पाहणी केली.
इर्षाळवाडी (रायगड) येथील दुर्घटनेनंतर राज्यभरातील प्रशासन अलर्ट झाले आहे. नाशिक शहरात गोदावरी नदीलगत डोंगराचा भाग आहे. हा डोंगर पिवळ्या मातीचा आणि भुसभुशीत आहे. त्याचा बराच भोग पावसाळ्यात सतत खचत असतो. त्यामुळे त्यावर राहणारे लोक अनेक वर्षे येथे संरक्षक भींत बांधण्याची मागणी कीरत आले आहेत. मात्र राजकीय नेत्यांकडून त्यावर फक्त निवडणुकीतच आश्वासने दिली जातात.
नव्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या सूचना आल्या आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून काझीगढीची पाहणी करण्यात आली. हे केवळ पाहणी पर्यंत मर्यादीत न राहता त्यावर ठोस उपाययोजना व्हावी, अशी अपेक्षा काझीगढीवासियांनी केली
रहिवासीयांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धोकादायक भागांची पाहणी केली. त्याठिकाणी धोकादायक वृक्ष आढळून आले. यासंदर्भात उद्यान विभागास पत्र देण्यात येणार आहे. येथील संपूर्ण परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.
- विनायक जाधव, अतिक्रमण निरीक्षक.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.