Dhule BJP news; शिवसेनेपुढे ‘भाजप’ची स्थिती चिंताजनक?

धुळे महापालिकेत बेबंदशाही, गैरप्रकाराचे दुसरे नाव भाजप अशी स्थिती झाल्याने पक्षापुढे आव्हान
Dhule Municiple Corporation
Dhule Municiple CorporationSarkarnama

निखिल सूर्यवंशी

धुळे : महापालिकेच्या (Dhule) माध्यमातून होणाऱ्या विविध विकास कामांमधील अनियमितता, गैरप्रकार, दिशाहीन प्रशासकीय कारभारासह चाललेली बेबंदशाही आणि निष्कृष्ट कामांप्रश्‍नी ठेकेदारांना दिले जाणारे अभय आदी मुद्दे हाताळत शिवसेनेचा (Shivsena) ठाकरे गट (Uddhav Thackrey) आक्रमक झाला आहे. त्यामुळे भाजपची (BJP) स्थिती रुग्णालयातील ‘सिरीयस’ रुग्णासारखी झाली आहे. शहरातील ‘डॅमेज कंट्रोल’ रोखण्याचे स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नेत्यांपुढे मोठ आव्हान असेल. (Public are fume for civic issues in Dhule city on Ruling BJP)

Dhule Municiple Corporation
Nashik Politics : सत्यजीत तांबेंना धक्का; ठाकरे गटाचा उमेदवार ठरला

बहुमतामुळे महापालिकेत गेली चार वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला यंदा वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे विरोधकांनी घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपच्या शहर- जिल्हा शाखेची नुकतीच एक बैठक झाली. पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. त्यात महापालिकेतील भाजपच्या चार वर्षांतील सत्ता कालावधीत शासनाकडून आलेला निधी आणि होणारी विविध कामे याविषयी प्रमुख पदाधिकारी ‘सिरीयस’ दिसून आले.

Dhule Municiple Corporation
Devendra Fadnavis : पुण्यासाठी 2 हजार कोटींचा निधी : फडणवीसांची घोषणा!

केंद्र व राज्य शासनाकडून धुळे शहरासाठी कोट्यवधींचा निधी मिळवून आणला आहे. तसेच राज्यात सत्तासंघार्षनंतर शिंदे- फडणवीस सरकार आल्यावर रस्ते कामांसाठी सुमारे शंभर कोटींचा निधी मिळाला आहे. परंतु, एमआयएमचे शहरातील आमदार फारुक शाह हे त्यांनी मिळवून आणलेल्या निधीतून निरनिराळ्या विकासकामांचे उद्‌घाटन करताना दिसतात. त्याप्रमाणे चार वर्षांत शहराला मिळालेल्या कोट्यवधींच्या निधीतून होणाऱ्या आपल्या विकास कामांची उद्‌घाटने, कार्यक्रम का दिसून येत नाहीत, असा प्रश्‍न भाजपच्या स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला. याप्रश्‍नी पक्षासह स्थानिक प्रमुख पदाधिकारी, नेते ‘सिरीयस’ असून नगरसेवकांनी चार वर्षांत केलेल्या कामांची यादी सादर करावी, तरच त्यांना या वर्षभरात मिळणाऱ्या निधीतून कामे दिली जातील, अशी तंबी देण्याची वेळ बैठकीत आली.

एकीकडे भाजपकडून महापालिकेद्वारे झालेले चार वर्षांतील प्रयत्न व शहर विकासाबाबत मंथन होत असताना शिवसेनेचा ठाकरे गट मात्र, आक्रमक झाला आहे. महापालिकेचे नियंत्रण उरले नसल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची निष्कृष्ट कामे, संरक्षक भिंत कोसळणे, स्वच्छतेचा बोजवारा, पाणीपुरवठ्याचे कोलमडलेले नियोजन, आरोग्याचा प्रश्‍न, खड्ड्यांचा गंभीर प्रश्‍न यासह विविध मुद्दे हाताळण्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुरवात केली आहे.

पूर्वी शिवसेनेचा महापौर, मनपात प्राबल्य असतानाही गटबाजीमुळे शिवसेना पोखरली गेली. परिणामी, गेल्या निवडणुकीत शिवसेनेचा एकच नगरसेवक महापालिकेत निवडून आला. त्यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न स्थानिक पदाधिकाऱ्यांना सतावत आहे. महापालिकेत पुन्हा प्राबल्य निर्माण होण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आता सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरवात केली आहे. आमदार फारुक शाह हे देखील आगामी आमदारकीची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महापालिकेसह भाजपला लक्ष्य करीत आहेत. डिसेंबर २०२३ ला महापालिकेची निवडणूक असल्याने आता विरोधी पक्ष भाजपविरोधात सक्रिय होताना दिसतील. विविध आंदोलने, निवेदनांचे सत्र सुरू होईल.

‘डॅमेज कंट्रोल’ चा प्रश्‍न

असे असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महापालिकेच्या माध्यमातून शहरात होणाऱ्या निष्कृष्ट कामांचा पर्दाफाश करण्याचे सत्र सुरू झाले आहे. हा गंभीर प्रश्‍न आहे. प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी मनपातील सत्ताधारी भाजपसह स्थानिक नेत्यांना शहरातील निष्कृष्ट कामे, कचरा संकलनातील भ्रष्टाचार यासह विविध अनियमित कारभाराबाबत सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याकडे डोळसपणे पाहिले असते तर भाजपपुढे आज प्रतिमा, प्रतिष्ठा टिकविण्याचा, ‘डॅमेज कंट्रोल’चा प्रश्‍न उभा ठाकला नसता. आदींसंदर्भात धुळेकरांमध्ये महापालिकेविषयी तीव्र नाराजी आहे. मुबलक पाणीसाठा असतानाही एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन का होऊ शकत नाही? भाजपचे नेते तोंडातून ‘ब्र’ काढण्यास तयार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com