Bawankule On Babanrao Gholap: बबनराव घोलपांना मोठी ऑफर; ठाकरे गटाची धडधड वाढली ?

Thackeray group and BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Uddhav Thackeray and Babanrao Gholap
Uddhav Thackeray and Babanrao GholapSarkarnama
Published on
Updated on

Nashik News: शिर्डी लोकसभा मतदारसंघात बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे यांच्यापैकी कोण, यावरून ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. यावरूनच बबनराव घोलप हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. घोलपांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने मुंबईत शिवसेना भवनात बैठकही झाली. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यास ठाकरेंना यश आलेलं दिसत नाही. अशातच बबनराव घोलप यांना मोठी ऑफर आली आहे.

"बबनराव घोलप भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच आहे", असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे आता ठाकरेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मतमतांतरे आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीच्या चर्चांनंतर घोलप नाराज झाल्याचे बोलले जाते. यावरूनच आता भाजप डाव साधण्याच्या तयारीत आहे.

Uddhav Thackeray and Babanrao Gholap
Beed District Politics : बीड भाजपवर 'रिपाइं' नाराज ? रामदास आठवलेंची कार्यक्रमाला हजेरी, पण पदाधिकाऱ्यांची दांडी

चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोलपांवर जाळे टाकण्यास सुरुवात केली असून, "बबनराव घोलप भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागत करू, पण आम्ही कुणालाही बोलवत नाही. त्यामुळे घोलपांनी त्यांचा निर्णय स्वत: घ्यावा", असे म्हणत बावनकुळेंनी एक प्रकारे घोलपांना ऑफरच दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटालाही अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे आता यावर बबनराव घोलप काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

माजी मंत्री बबनराव घोलपांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे, तर दुसरीकडे माजी आमदार योगेश घोलप यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. ते बबनराव घोलप यांचे सुपुत्र आहेत, तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलताना घोलपांबाबत मोठं विधान केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By- Ganesh Thombare

Uddhav Thackeray and Babanrao Gholap
Shirdi Politics : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे ? शिवसेना भवनातील बैठकीत नेमकं काय ठरलं ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com