Shirdi Politics : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे ? शिवसेना भवनातील बैठकीत नेमकं काय ठरलं ?

Babanrao Gholap vs Bhausaheb Wakchaure : बबनराव घोलप यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक पार पडली.
Babanrao Gholap, Bhausaheb Wakchaure, Uddhav Thackeray
Babanrao Gholap, Bhausaheb Wakchaure, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: शिर्डी लोकसभा मतदारसंघात बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवरून ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. यावरूनच बबनराव घोलप हे नाराज असल्याची चर्चा असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेतेपदाचा राजीनामा दिला.

या पार्श्वभूमीवरच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत शिवसेना भवनात गुरुवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला माजी मंत्री बबनराव घोलप यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिर्डीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला विरोध केला.

Babanrao Gholap, Bhausaheb Wakchaure, Uddhav Thackeray
Nashik Shivsena news : ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांचा उपनेते पदाचा राजीनामा

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना शिर्डीतून लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असून संपर्कप्रमुख या नात्याने त्यांनी शिर्डीत मोर्चेबांधणीही सुरू केली होती. मात्र, शिर्डीतून वाकचौरे यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याच्या चर्चांनंतर घोलप हे नाराज झाल्याचे बोलले जाते.

बबनराव घोलप यांची नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठकही पार पडली. मात्र, घोलप यांच्या समर्थकांनी आम्हाला आमचे म्हणणे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडायचे असून त्यासाठी बबनराव घोलप यांच्यासह आम्हाला उद्धव ठाकरे यांची वेळ देण्याची मागणी सुनील शिंदे यांच्याकडे केली.

Babanrao Gholap, Bhausaheb Wakchaure, Uddhav Thackeray
Gholap Increased Thackeray Tension : बबनराव घोलपांनी वाढविले ठाकरे गटाचे टेन्शन

बबनराव घोलप हे निष्ठावंत म्हणून ठाकरे गटाकडे राहिले आहेत. त्यामुळे त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. यानंतर आता ठाकरेंसमोर देखील मोठा पेच निर्माण झाला असून बबनराव घोलप यांच्यासह त्यांच्या समर्थकांना उद्धव ठाकरे वेळ देणार का, तसेच शिर्डी मतदारसंघासाठी ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीत ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीवर देखील स्पष्टीकरण दिले. वाकचौरे यांची पुन्हा शिवसेनेत येण्याची इच्छा होती, त्यामुळे त्यांना प्रवेश दिला. पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ज्या पद्धतीने काम सुरु आहे, त्यापेक्षा जोमाने काम सुरु ठेवा, असे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना बैठकीत देण्यात आले. त्यामुळे बबनराव घोलप हे आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited by - Ganesh Thombare

Babanrao Gholap, Bhausaheb Wakchaure, Uddhav Thackeray
Shirdi Politics : शिर्डीवरून 'मातोश्री'वर खडाजंगी; बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे ? ठाकरेंसमोर मोठा पेच

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com