Nashik News, 31 May : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून ( ता. 31 मे ) सुरू झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार किशोर दराडे यांना मोठे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.
या निवडणुकीत शिक्षकांची प्रातिनिधिक संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही आघाडीने कोणाला पाठिंबा द्यावा, यावरून मतभेद आहेत. त्यामुळे या आघाडीचे बिघाडी झाली आहे. या संघटनेने आतापर्यंत संदीप गुळवे (नाशिक), भाऊसाहेब कचरे (नगर) आणि आप्पासाहेब शिंदे (नगर) या तीन उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मोठा राजकीय पेच आहे.
काँग्रेस पदाधिकारी संदीप गुळवे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. 'टीडीएफ' संघटनेचा पाठिंबा मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाचाही पाठिंबा मिळविला आहे. आता ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा पाठिंबा मिळवण्यासाठी शिवसेनेच्या संपर्कात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुळवे हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याने आमदार किशोर दराडे अस्वस्थ आहेत. यापूर्वी दराडे यांनी शिवसेनेच्या पाठिंबावर ही निवडणूक लढवली होती. यंदा त्यांना तसे सहकार्य मिळण्याची शक्यता कमी झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला आहे.
आमदार दराडे शिंदे गटाकडून पाठिंबा मिळवण्यात यशस्वी झाल्यास शिवसेनेच्या ठाकरे गटात पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होऊ शकतो. दराडे यांचे बंधू नरेंद्र दराडे हे देखील विधान परिषदेचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत.
नाशिक विभाग विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. विशेषत: नाशिक आणि नगर मध्ये अनेक संस्थाचालक उमेदवारीच्या तयारीला लागल्याने यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होऊ शकते. येत्या आठवड्याभरात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.