sameer Bhujbal
sameer BhujbalSarkarnama

बार्टी, सारथी, महाज्योतीला बळ देऊन समतोल साधला!

नाशिककरांसाठी आशादायी तर राज्याच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प
Published on

नाशिक : राज्याचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेला अर्थसंकल्प नाशिककरांसाठी आशादायी आहे. त्यातून राज्याच्या विकासाला दिशा मिळणार आहे, असे माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांनी सांगितले.

sameer Bhujbal
अजित पवार यांनी समाजाच्या सर्व घटकांना न्याय दिला!

त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षाच्या काळात देशात, राज्यात कोरोनाचे सावट होते. त्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर आता राज्याच्या विकासाला पुन्हा गती मिळाली आहे. त्याचा प्रत्यय यंदाच्या अर्थसंकल्पातून येतो आहे.

नाशिककरांसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर १६ हजार ३९ कोटी रुपयांच्या नाशिक-पुणे मध्यम अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूसंपादन सुरु करण्यात आले. राज्यशासन या प्रकल्पाचा ८० टक्के खर्च उचलणार आहे. त्याची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने प्रकल्पाला अधिक गती मिळणार आहे.

sameer Bhujbal
महाविकास आघाडी नाशिकवर उदार...हायस्पीड रेल्वेला १६ हजार कोटी

प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक उभारण्यात येईल. महाराणी सईबाई स्मृतीस्थानाचा विकास, श्री संत जनागडे महाराज स्मारकांसाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३० हजाराहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख रोजगार संधी उपलब्ध करण्यात येतील. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थाना विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकी २५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.

विद्यार्थी तसेच बेरोजगारांना अधिक फायदा होईल. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व निश्चित करण्यासाठी नवीन समर्पित मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आरक्षणासह ओबीसींचे प्रश्न निकाली लागण्यास मदत होईल. त्यामुळे हा अर्थसंकल्प राज्याला दिशा देणारा आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com