Bycott Movies trend; बायकॉट अस्त्र फेल...दर दुप्पट तरीही `पठाण` हाऊसफुल्ल!

पठाण चित्रपटांवरील राजकीय मंडळींचे बहिष्कारास्त्र सपशेल फेल?
Pathan Movie poster
Pathan Movie posterSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : गेले काही दिवस देशात बायकॉट (Bycott) सिनेमा हा राजकीय ट्रेंड सुरु केला होता. त्याचा धसका अनेक बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांना बसला. मात्र पठाण (Pathan) सीनेमाने त्यावर दणदणीत मात केली असुन बहिष्कारास्त्र सपशेल अपयशी ठरले आहे. चित्रपट शौकीनांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. नाशिक (Nashik) शहरात या सीनेमाचे रोज चक्क 63 शो होणार आहेत. (Pathan movie will show Record daily 63 shows per day)

Pathan Movie poster
Shivsena News; गोळीबार प्रकरणी शिंदे गटाकडून दबाव, सत्तेचा दुरुपयोग?

या सिनेमावर बायकॉट करण्यासाठी सोशल मीडियावर चळवळ सुरू होती. काही तथाकथीत हिदूत्ववादी संघटनांनी याबाबत चळवळ चालवली होती. त्यामुळे त्याबाबत राजकीय पक्ष, संघटना, नेते या सगळ्यांमध्ये त्यावर गरमा गरम चर्चा होती. `कुर्सीकी पेटी बांधला मौसम बिगडने वाला है` याचा प्रत्यय त्यातून येत होता. याबाबत अनेक तक्रारी आल्याने सेन्सॉर बोर्डाने देखील चित्रपटात काही बदल सुचवले होते. त्यामुळे हा चित्रपट चालेल का याबाबत साशंकता होती.

Pathan Movie poster
Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकर काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेबरोबर आघाडी करण्यास तयार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुंबई शहरात विविध घटकांशी बैठक घेऊन चर्चा केली होती. त्यात देखील अभिनेता सुनील शेट्टी यांनी `बायकॉट ट्रेंड` विषयी चिंता व्यक्त केली होती. अभिनेता अमीर खान यांच्या लालसींग चढ्ढा सीनेमाला या ट्रेंडची झळ बसली होती. मात्र अॅक्शनपट पठाणने त्यावर मात केल्याचे दिसते.

नाशिक शहरात दी झोन मल्टीप्लेक्सला 12, सीनेमॅक्स (सीटी सेंटर मॉल) येथे 21, आयनॉक्स 10, दिव्य अॅडलॅब्ज (सिडको) 14 आणि सीनेमॅक्स रेजीमेंटल प्लाझा येथे 9 असे रोज 63 शो होणार आहेत. पहिला शो सकाळी सातला तर शेवटचा शो रात्री बाराला आहे. याचा अर्थ वीस तास पठाण चित्रपट दाखविला जाणार आहे. नाशिकला असे यापूर्वी घडलेले नव्हते.

विशेष म्हणजे बॉलीवुडच्या विविध सीनेमांना `बायकॉट`ची झळ बसलेली असल्याने अनेकांना त्याबाबत धास्ती वाटत होती. मात्र निर्मात्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने हा सिनेमा आणला असून सकाळच्या खेळाचे तिकीट दर सामान्यपणे शंभर रुपये तर मुख्य शोचे तिकीट दर 300 रुपये असताना या सिनेमासाठी सकाळच्या शोचे दर तीनशे तर मुख्य शोचे तिकीट दर 480 म्हणजे जवळपास दुप्पट करण्यात आले आहे. तरीही यातील सुरवातीचे शो हाऊसफुल्ल दिसतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com