Shivsena News; गोळीबार प्रकरणी शिंदे गटाकडून दबाव, सत्तेचा दुरुपयोग?

गोळीबार प्रकरणावरून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी
Firing in Deolali picture
Firing in Deolali pictureSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) शिवजयंतीच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वर्गणीचा हिशेब मागीतल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे सहसंपर्क नेते राजू लवटे (Suryakant Lawte) यांच्या पुतन्याने हवेत गोळीबार केला होता. शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटातील हा वाद अद्यापही धुमसत आहे. आता त्यात पालकमंत्री (Dada Bhuse) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर विरोधकांकडून टिका होऊ लागली आहे. (Eknath Shinde Group`s leader complain to police against Shivsena leaders)

Firing in Deolali picture
Shivsena News; भाजपने 154 कोटी खर्च केले, पाणी कुठे आहे?

यासंदर्भात आज गुन्हा दाखल झालेले संशयीत स्वप्नील यांचे काका, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी तक्रार करणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक अस्लम उर्फ भैय्या मनियार यांसह तिघांविरोधात पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे.

Firing in Deolali picture
Adv. Prakash Ambedkar; पंतप्रधानपदाची पातळी ग्रामपंचायतीच्या स्तरापर्यंत घसरली!

गुरुवारी रात्री देवळाली गाव येथे झालेल्या ग्रामस्थ व शिवजन्मोत्सव समितीच्या बैठकीत शिंदे गटाचे नेते सूर्यकांत लवटे आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांत वाद झाला होता. त्यानंतर तेथे गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली होती.

याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सागर किसन कोकणे यांच्या तक्रारीवरून एकनाथ शिंदे गटाचे संपर्कप्रमुख राजू लवटे यांचे पुतने स्वप्नील सूर्यकांत लवटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

हा वाद अद्यापही धुमसत आहे. आज यासंदर्भात माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यांविरोधात तक्रार केली. शिवजन्मोत्सव समितीची बैठक झाली. त्या बैठकीत माजी नगरसेवक भैय्या मणियार, प्रशांत जाधव, सागर कोकणे व त्यांच्या ८० ते १०० कार्यकर्त्यांनी शिवजन्मोत्सव समितीच्या हिशोब मागत वाद घातला. त्यावेळी कोयते आणि काठ्या घेऊन कार्यकर्त्यांनी आपणास शिवीगाळ केली. यावेळी गर्दीतील एकाने बंदुकीतून गोळी झाडली, असे म्हटले आहे.

याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक मनियार म्हणाले, सत्तेचा दुरुपयोग करून शिंदे गटाचे लोक पोलिसावंर दबाव आणत आहेत. त्यात पालकमंत्र्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याची चर्चा आहे. घटना उपनगर पोलिसांच्या हद्दीत घेतली. त्याचे व्हीडीओ फुटेज उपलब्ध आहे. त्यात गोळीबार करणारा स्पष्ट दिसतो आहे. त्याला अटक झाली आहे. त्यानंतर तीन दिवसांनी शिंदे गटाचे लवटे तक्रार देतात. तक्रार उपनगर पोलिसांत व त्याचा तपास मुंबई नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आहेर यांच्याकडे दिला आहे. यातूनच यातील दबाव स्पष्ट होतो. शिवसेना कार्यकर्ते त्याला घाबरत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com