Maratha Reservation : जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ विहितगावला सर्व पक्ष आले एकत्र!

Candle march in Vihitgaon in support of Maratha reservation for community-सकल मराठा समाजातर्फे इशारा...विहितगावला नागरिकांनी काढला कँडल मार्च!
Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik Maratha News : मराठा समाजाल आरक्षण मिळावे, या मागणीसाठी समाजातील अस्वस्थता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. या मागणीसाठी रविवारी सायंकाळी विहितगाव येथे ग्रामस्थांनी परिसरात कँडल मार्च काढला. (On the issue of Reservation, the Mratha community has started to feel uneasy)

राजकीयदृष्ट्या जागरूक मानल्या जाणाऱ्या विहितगावमध्ये (Nashik) सकल मराठा समाजातर्फे (Maratha) आरक्षणाच्या प्रश्नावर, तसेच राज्य सरकारच्या (Maharashtra) निषेधार्थ कँडल मार्च काढण्यात आला.

Manoj Jarange-Patil
Sanjay Raut News : ''भीमा-कोरेगावप्रमाणे दंगली उसळाव्यात यासाठी सरकार...'' ; संजय राऊतांचं मोठं विधान!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या उपोषणाविषयी राज्य शासनाने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. त्याला चाळीस दिवस संपल्यानंतरदेखील काहीही ठोस कार्यवाही झाली नाही. याबाबत राज्य शासनाच्या भूमिकेच्या निषेधार्थ विविध प्रकारची आंदाेलने पुन्हा सुरू झाली आहेत.

विहितगाव (नाशिक) येथे सकल मराठा समाजातर्फे सायंकाळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्च काढण्यात आल्यानंतर ग्रामस्थांनी समाजातील युवक तसेच नागरिक आरक्षणाच्या प्रश्नावर संवेदनशील आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन हा प्रश्न सोडवावा; अन्यथा त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा इशारा देण्यात आला.

या वेळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. मार्चच्या आयोजनात संजय कोठुळे, शिवाजी हांडोरे, विक्रम कोठुळे, उत्तमराव कोठुळे, माजी नगरसेविका सुनीता कोठुळे, संजय हांडोरे, आत्माराम आढाव, भगीरथ हांडोरे, दिनेश हांडोरे, रोहित मते आदींनी पुढाकार घेतला होते.

Manoj Jarange-Patil
Indurikar Maharaj Big News : मराठा आरक्षणावरून वातावरण पेटलं; इंदुरीकर महाराजांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com