Indurikar Maharaj Big News : मराठा आरक्षणावरून वातावरण पेटलं; इंदुरीकर महाराजांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Maratha Reservation News : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता राज्यभर आता वाढू लागली आहे.
Indurikar Maharaj
Indurikar Maharaj Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत आंदोलनामुळे सरकारची धडधड वाढवली आहे. तसेच राजकीय नेत्यांना विरोधात मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ठिकठिकाणी नेत्यांच्या गाड्या अडवल्या जात असून, तोडफोडही होत आहे. याचवेळी शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी तर खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

अशातच आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी तापलेल्या मराठा आरक्षणाच्या धर्तीवर आजवरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

Indurikar Maharaj
Maratha Reservation News : नेत्यांच्या चमकोगिरीविरोधात मराठा समाज आक्रमक ; राणा पाटील, सावंत यांचे पोस्टर फाडले..

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांच्या कीर्तनाला श्रोत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते, पण याच इंदुरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला आहे. याचवेळी त्यांनी आजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतानाच तब्बल पाच दिवस कीर्तन न करण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर महाराजांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारपासून पाच दिवस एकही कार्यक्रम वा कीर्तन न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इंदुरीकर महाराजांचे दिवसाच्या कार्यक्रमांचे नियोजन ठरलेले असते, पण जालन्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांनी त्याला पाठिंबा देत पाच दिवस कीर्तनाचे कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे उद्यापासून ते पाच दिवसांपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द झाले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, इंदुरीकर महाराज हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना भेटण्यासाठी जालन्याला जाणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मंत्री विखेंनाही मराठा आंदोलनाचा फटका...

मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाची राज्यभर आंदोलनाची तीव्रता आता वाढू लागली आहे. राज्यकर्त्यांना मराठा समाजाकडून आता टार्गेट केले जाऊ लागले आहे. संगमनेर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेले नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनादेखील मराठा समाजाच्या आंदोलनाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

संगमनेरमध्येदेखील बस स्थानकाबाहेर मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे रविवारी गेले होते. आंदोलनाच्या व्यासपीठावर मंत्री विखे चढताच त्यांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Indurikar Maharaj
Maratha Reservation: मराठा आंदोलनाचा 'लालपरी'नेही घेतला धसका; नगर एसटी मंडळाच्या बीड, धाराशिवच्या फेऱ्या रद्द

तेवढ्यात विखे पाटील परत जा...परत जा.., अशा घोषणा काहींनी सुरू केल्या. एक मराठा लाख मराठा.. अशीही घोषणाबाजी सुरू झाली. मंत्री विखे यांच्याबरोबर असलेल्या पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना बाजूला घेतले. तरीदेखील तरुण जोरदार घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेतले.

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, अन्...

मराठा आरक्षणासाठी सरकारने मागितलेली एका महिन्याची आणि मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली दहा दिवसांची अतिरिक्त मुदत संपल्यानंतर अंतरवाली सराटीतील बेमुदत उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. (Maratha Reservation News) उपोषण सुरू करण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पुढचे आंदोलन हे सरकारला झेपणारही नाही अन् पेलणारही नाही, असा इशारा दिला होता. त्याची प्रचिती आता राज्याच्या विशेषतः मराठवाड्यात येऊ लागली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Indurikar Maharaj
Maratha Reservation News : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, अन् न पेलणारे आंदोलन सुरू..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com