NCP Crisis News: 'दोन्हीही पवार एकत्र येतील'; राष्ट्रवादीच्या आमदारांना आशा..

Ajit Pawar Rebel : "शरद पवार यांच्यावर तितकेच प्रेम व राजकीयदृष्ट्या त्यांची गरज आहे"
Ncp Crisis News : Ajit Pawar : Sharad Pawar
Ncp Crisis News : Ajit Pawar : Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. भाजप सोबत जाण्याच्या पवार यांच्या निर्णयाला जवळपास पक्षातील ४० आमदारांनी पाठींबा दिला असला तरी या सर्व आमदारांचे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही तितकेच प्रेम व राजकीयदृष्ट्या त्यांची गरज आहे . तीच बाब अजित पवार यांच्या बाबतही लागू होते. (Latest Marathi News)

मतदारसंघांत निधी मिळवायचा असेल तर अजित पवार यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा यावरून मोठी अडचण दोन्हीं गटाच्या आमदारांमध्ये तयार झाली आहे. यामुळेच अजूनही बरेच आमदार द्विधा मनस्थितीमध्ये आहेत . यामुळेच राष्ट्रवादीच्या आमदारांना दोन्हीही पवार पुढील काही महिन्यांत एकत्र येतील अशी आशा आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्यावर टीका न करण्याचे धोरण एकमताने ठरवल्याची माहिती एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Ncp Crisis News : Ajit Pawar : Sharad Pawar
Bachchu Kadu News: ...प्रार्थना ऐकली अन् बच्चू कडू यांचं मत बदललं; हे सगळं कशासाठी करायचं ?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बहुतांश आमदारांनी अजित पवार यांच्या गटाला साथ देण्याचे ठरवले आहे. आपलाच पक्ष सत्तेत आल्याने या मिळालेल्या सत्तेचा फायदा घेत मतदार संघात मोठ्या प्रमाणत निधी खेचता येईल, हा विचार करून अनेक आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याला पसंती दर्शवली आहे . पण येणारी विधानसभा निवडणुक ही वर्षभरावर आली आहे . त्याचवेळी शरद पवार यांनी आपण भाजप विरोधात निकराची लढाई लढणार असल्याचे घोषित केले आहे व त्यासाठी मला कितीही कष्ट पडले तरी मागे हटणार नाही असे जाहीर केलं आहे .

याचा प्रत्यय शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाच दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर, मिळालेला प्रतिसाद अजित पवार गटाच्या मनात धडकी भरवणारा होता. त्यामुळे आम्हा आमदारांची मोठी अडचण निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली . ही अडचण दोन्हीं पवार एकत्र आले तरच सुटू शकले नाहीतर इकडे आड तिकडे विहीर अशी आमची गत झाली असल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली.

Ncp Crisis News : Ajit Pawar : Sharad Pawar
NCP Split : "अजून काय पाहिजे" नंतर आता रोहित पवार म्हणतात, "मुद्यांच बोला..'; जुन्या सहकाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न

राज्यातील सर्व मतदारसंघात शरद पवार यांच्या ताकद त्याचबरोबर त्यांना मानणारा वर्गही मोठा आहे . त्याचं बरोबर अजित पवार यांच्या कामाचा अवाका व सत्तेत असल्याने मतदासंघांत मिळणारा निधी याचीही जाणीव सर्व राष्ट्रवादीचा आमदारांना आहे. त्यामुळे नेमकं कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला नाही? यावरून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com