Maharashtra Cabinet Expansion : अजित पवारांना अर्थ, तर वळसेंना सहकार मिळणार? राष्ट्रवादीच्या खात्यांची संभाव्य यादी..

Maharashtra Government Cabinet Expansion News : राष्ट्रवादीला कोणकोणती खाती मिळणार?
Maharashtra Cabinet Expansion :
Maharashtra Cabinet Expansion :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजप प्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत, उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. हा एकनाथ शिंदेंच्या आमदारांसाठी धक्का देणारा निर्णय होता. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपात घोडं अडल होतं ते अर्थखातं राष्ट्रवादीला सोडायला हवे का यावरून, म्हणूनच शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा होती. (Latest Marathi News)

Maharashtra Cabinet Expansion :
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार; म्हणाले, ‘ती’ फडणवीसांची नव्हे, तर तुमची अवस्था !

मात्र आता अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाहांच्या भेटीनंतर अर्थखात्याचं तिढा सुटल्याचं असं दिसून येत आहे. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती, एका मराठी वृत्तवाहिनेने दिली आहे. अजित पवारांना अर्थखात्यासोबतच, दिलीप वळसे पाटील यांना सहकार खातंही मिळाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे असलेलं अर्थ खातं अजित पवारांकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जाते.

Maharashtra Cabinet Expansion :
Eknath Shinde On Thackeray: महाकलंक तर तुम्ही आहात; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

राष्ट्रवादीकडे कोणती खाती असणार ?

अर्थ खातं आणि सहकार खात्याशिवाया अजित पवार गटाकडे महिला आणि बाल विकास मंत्रालय, युवक कल्याण मंत्रालय, सामाजिक न्याय मंत्रालय ही खाती राष्ट्रवादीकडे राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देण्यावरून शिंदेच्या शिवसेनेचा विरोध असल्याची चर्चा होती. आता अर्थ आणि सहकार हे महत्त्वाची खाती अजित पवारांकडे गेले तर एकनाथ शिंदे गटाची काय भूमिका असेल, त्यांचा विरोध काय राहिल का? हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

राष्ट्रवादीच्या खात्यांची संभाव्य यादी -

अर्थ - अजित पवार

कृषी - धनंजय मुंडे

सहकार- दिलीप वळसे पाटील

वैद्यकीय शिक्षण - हसन मुश्रीफ

अन्न नागरी पुरवठा - छगन भुजबळ

अन्न आणि औषध प्रशासन - धर्मराव अत्राम

क्रीडा- अनिल भाईदास पाटील

महिला आणि बालकल्याण - अदिती तटकरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com